दोन लसी घेतलेल्यांनाही आता मॉल बंद!

दोन लसी घेतलेल्यांनाही आता मॉल बंद!

मुंबईतील कोविडचा हाहाकार कमी होऊ लागल्यामुळे शहरातील निर्बंध हटवण्यात आले होते. मुंबईतील लोकल, दुकाने यांना मुभा देण्यात आली होती. मुंबईतील मॉल देखील लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांसाठी उघडण्यात आले होते. मात्र याबाबत सरकारने मॉल दोन लसी घेतलेल्यांनाही खुला नसेल.

मुंबईतीतल मॉल यापूर्वी ठाकरे सरकारने सर्वसामान्यांसाठी खुले केले होते. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये खरेदीची मुभा देण्यात आली होती. मात्र दोन दिवसांच्या आतच सरकारने हा निर्णय पुन्हा फिरवला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने मॉल्सला परवानगी देताना मॉलमधील सर्व दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झाले असणे बंधनकारक केले होते. सरकारच्या सर्व अटींची पूर्तता झाली नसेल तर राज्यातील सर्व मॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये विमानातही चेंगराचेंगरी

मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस

‘एवढी’ संपत्ती घेऊन घनी पळाले

राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

मुंबई आणि परिसरातील सर्व मॉल्स गेले चार महिने बंद होते. हे मॉल्स १५ ऑगस्ट २०२१ पासून उघडण्यात आले होते. काल याबाबत सरकारने एक पत्रक काढले होते. या पत्रकानुसार मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झाले असणे आवश्यक केले गेले आहे.

याबाबत झी बिझनेसने दिलेल्या वृत्तानुसार शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि इन्फिनीटी मॉलचे सीईओ मुकेश कुमार यांनी सांगितले की, चार महिने उद्योग बंद राहिल्यानंतर काही आशा निर्माण झाल्या होत्या परंतु मॉलसाठी सरकारने लादलेल्या अटी या पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील मॉल बंद होणार आहेत.यासंदर्भात किरकोळ व्यापाऱ्यांची संघटनेचे अधिकारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आहेत.

Exit mobile version