जपानमध्ये नुकत्याच ऑलिम्पिक पार पडल्या. या स्पर्धांमध्ये मल्लखांब या खेळाचा समावेश होऊ शकला नसला तरीही, या खेळाला जपानमध्येही हळूहळू लोकप्रियता प्राप्त होऊ लागली आहे. टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये या खेळाचा समावेश होईल अशी अपेक्षा देशातील मल्लखांब खेळाडूंना होती, मात्र दुर्दैवाने ती पूर्ण होऊ शकली नाही.
भारातने १९३६ साली जर्मनीला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मल्लखांबाचे प्रात्यक्षिक करून दाखवले होते. त्यावेळेस अमरावती येथील खेळाडूंनी हे प्रात्यक्षिक करून दाखवले होते. त्यामुळे खुद्द हिटलर देखील प्रभावित झाला होता. इतकेच नव्हे, तर त्याने या खेळाडूंचा विशेष पदक देऊन सन्मान देखील केला होता. मात्र ८५ वर्षांनंतरही या खेळाला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळू शकलेला नाही याबद्दल मुंबईतील मल्लखांब खेळाडू दीपक शिंदे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत खंत व्यक्त केली.
हे ही वाचा:
एसटीचे कर्मचारीही थकले आणि त्यांचे वेतनही
…आणि डॉक्टरच्या खात्यातून गायब झाले पैसे
पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक
महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
दीपक शिंदे यांना मल्लखांब खेळामध्ये दोन सुवर्ण पदके आणि तीन रौप्य पदके मल्लखांबाच्या २०१९ सालच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत मिळाली आहेत. त्यांच्या सोबत दोरीवरचा मल्लखांबात प्राविण्य मिळवणाऱ्या हिमानी परब यांना देखील त्याच स्पर्धेत चार सुवर्ण आणि दोन कांस्य पदके मिळाली आहेत. जर ऑलिम्पिकमध्ये निवड झाली असती तर या दोन्ही खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये पुरूष आणि महिला संघाचे नेतृत्व केले असते. या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये केला जावा अशी विनंती भारतासोबतच अमेरिका आणि खुद्द जपान येथील मल्लखांब फेडरेशन तर्फे ऑलिम्पिक कमिटीकडे करण्यात आली होती.
सध्याच्या घडीला जपानमधील मल्लखांब संघटनेच्या प्रयत्नांमुळे त्यांच्याकडे १५ प्रशिक्षित मल्लखांब खेळाडू आहेत. दळणवळणाच्या सर्व संकटांवर मात करून जपानमध्ये केवळ एकच मल्लखांब आयात केला जाऊ शकला आहे, तर भाषेच्या अडचणींमुळे मल्लखांबाचे प्रशिक्षण आणणे हे आणखी अवघड आहे.
या सर्वांवर मात करून काइको टाकेमोटो यांनी सुवर्ण पदके जिंकल्यानंतर त्यांना हळूहळू प्रसिद्धी मिळू लागली आहे. त्यामुळे हा खेळ जपानमध्ये लोकप्रिय होत आहे. मुंबईत झालेल्या २०१९ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण पदके त्यांनी जिंकली आहेत.
या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेनंतर पुढची स्पर्धा २०२२ साली होणार आहे. यावेळेस ही स्पर्धा न्यु यॉर्क येथे होणार असून या स्पर्धेसाठी ऑलिम्पिक समितीचे सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.