भारताच्या शेजारील देश मालदीवमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली असून पोलिसांनी तशा सूचना जारी केल्या आहेत.रविवारी २४ डिसेंबर रोजी मालदीव पोलिसांनी एक निवेदन जारी करून लोकांना बेटावरील देशात कोठेही ख्रिसमस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे.ख्रिसमसच्या संदर्भात मालदील पोलिसांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा चीन समर्थक मोहम्मद मोइज्जू गेल्या महिन्यातच देशाचे नवे राष्ट्रपती बनले आहेत.
चीन समर्थक आणि भारतविरोधी अजेंडा चालवण्यात निष्णात असलेले मोहम्मद मोइज्जू हे राष्ट्रपती झाल्यानंतर सर्वप्रथम तुर्कीला गेले होते, तर आजपर्यंत अशी परंपरा आहे की मालदीवमध्ये शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती पहिल्यांदा भारताला भेट देतात.
हे ही वाचा:
इस्राइलच्या बॉम्बवर्षावात गाझातील ७० लोक ठार
‘न्यूज क्लिक’ प्रकरणी एचआर विभागाचे प्रमुख सरकारी साक्षीदार होण्यास तयार
यावर्षी २०२ वाघांचा मृत्यू, एका दशकातील सर्वाधिक वाढ!
चुनाभट्टीत गुंड येरुणकरचा गेम करणारे चार हल्लेखोर अटकेत
मालदीव हा एक बेट देश आहे ज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित आहे आणि जगभरातील विविध देशांतील विविध धर्म आणि समुदायाचे लोक मालदीवला भेट देतात आणि अशा देशात ख्रिसमसच्या विरोधात सार्वजनिक सूचना जारी करणे थोडे विचित्र आहे.मालदीव हा ९८ टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालदीवच्या कोणत्याही वस्ती असलेल्या बेटांवर ख्रिसमसचे उत्सव आयोजित केले जाऊ नयेत. मालदीवच्या कायद्यानुसार आणि देशाच्या कायद्याच्या विरोधात अशा प्रकारच्या कार्यक्रमावर बंदी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे कोणत्याही बेटावर ख्रिसमस साजरा करण्यासाठी कोणतेही उपक्रम आयोजित करू नयेत आणि जो कोणी आदेशाचे पालन करणार नाही त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.