मालदीवमध्ये झालेल्या निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू यांनी राष्ट्रपती पदावर विजय मिळविल्यानंतर मोहम्मद मुइज्जू १७ नोव्हेंबरला राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत.राष्ट्रपती पदावर विजय मिळविल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी भारतीय राजदूताची भेट घेत सांगितले होत की, भारतीय सैन्याला मालदीव सोडावे लागेल. मालदीवच्या भूमीवर एकही परदेशी सैनिक राहणार नसल्याचे ते म्हणाले होते. मोइज्जू यांची भूमिका भारताच्या बाजूने नसल्याने भारतीय सैनिकांच्या जागी चिनी सैनिकांना परवानगी मिळाले असे बोलले जात होते. मात्र, चिनी सैनिक भारतीय सैनिकांची जागा घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मोहम्मद मुइज्जू यांचा चीनशी जास्त जवळीकपणा आहे असे म्हटले जात होते. अशा चर्चां त्यांनी फेटाळून लावल्या आहेत.मोहम्मद मुइज्जू म्हणाले, मी असे म्हणत नाही की भारतीय सैनिकांनी आपला देश सोडावा जेणेकरून इतर देशांना आपले सैन्य येथे आणण्यासाठी जागा मिळेल. आपण केवळ मालदीवचे समर्थक असून चीन किंवा इतर कोणत्याही देशाला भारतीय सैनिकांची जागा घेऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
ऐन दिवाळीत कॅनडात खलिस्तानी आणि हिंदूंमध्ये संघर्ष!
संजय राऊत यांनी ज्यूं विरोधात हिटलरच्या नरसंहाराचे केले समर्थन!
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे पोलिसांच्या ताब्यात
शेहला रशीद म्हणते, काश्मीर म्हणजे गाझा नाही, श्रेय मोदी, शहांचे!
हिंदी महासागर द्वीपसमूहातील प्रतिस्पर्ध्यावर अध्यक्ष मोइझ्झू म्हणाले की, मालदीव हा या स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी खूप लहान देश आहे. अशा परिस्थितीत मालदीवच्या परराष्ट्र धोरणात त्याचा समावेश करण्यात मला विशेष रस नाही. आम्ही भारत, चीन आणि इतर सर्व देशांसोबत एकत्र काम करणार आहोत. मालदीवच्या भल्यासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.