नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफजई हिने बर्मिंगहममध्ये लग्न केले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला आहे. मलालाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे. त्याच बरोबर काही महिन्यांपूर्वी मालालाने विवाहाबाबत प्रसिद्ध फॅशन मॅगझीन ‘व्होग’ला दिलेल्या मुलाखतीत विवाह आणि पार्टनरशिपसारख्या मुद्यांवर काही मते व्यक्त केली होती. तिने केलेली वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
मुलाखतीत मलालाने लग्नाला अनावश्यक म्हटले होते. लोकांना जीवनसाथी हवा असेल तर तुम्ही कागदावर स्वाक्षरी का करता, ही एक परस्पर सहमतीने केलेली भागिदारी का असू शकत नाही, असा प्रश्न मलालाने उपस्थित केला होता. त्यानंतर पाकिस्तानमधून मलालावर प्रचंड टीका झाली होती. एकीकडे लग्नाला विरोध करणारी मलाला आता स्वतःच विवाहबद्ध झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे आणि सोशल मीडियावर तिच्या ढोंगीपणाबद्दल टीका होत आहे.
२६ नोव्हेंबरपासून पुन्हा दिल्लीत ट्रॅक्टर रॅली?
अनियंत्रित परदेशी देणग्यांचा वापर राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये
रियाझ भाटी म्हणतो, मी राष्ट्रवादीचाच
३४% जागांवर भाजपाचा बिनविरोध विजय
मलाला हिने असर मलिक यांच्याशी विवाह केला असून मलाला एक कार्यकर्ती म्हणून प्रसिद्ध आहे, तर तिचा नवरा असेर मलिक हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (PCB) महाव्यवस्थापक (हाय परफॉर्मन्स) आहेत.
मुलींच्या शिक्षणासाठी प्रचार करत असल्याने पाकिस्तानी तालिबानींनी मलालावर गोळीबार केला होता. वयाच्या १५व्या वर्षी मलालाच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर मलाला बरी झाली होती. २०१४ मध्ये वयाच्या १७व्या वर्षी तिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.