सोशल मीडियावर खड्डाखडी; नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली

सोशल मीडियावर खड्डाखडी; नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली

मुंबई आणि उपनगरांमधील खड्डे हा एक चर्चेचा विषय बनला आहे. शहरांमधील अंतर्गत आणि मुख्य मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडले आहेत. डोंबिवली- कल्याण परिसरातही मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पालिकेकडून खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम केले जाते, मात्र वाहनांचा सततच्या वर्दळीमुळे या खडीचा काहीही उपयोग होत नाही. या खड्ड्यांवरून आता रहिवाशांनी मीम्स आणि वात्रटिका तयार केल्या आहेत. मनोरंजन करणारे आणि पालिकेची खिल्ली उडवणारे हे मीम्स समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

एकीकडे खड्ड्यांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडीचा त्रास आणि पाठ दुखीसारखे आजार सतावत असताना या मीम्समुळे तरी कल्याण- डोंबिवली पालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामे प्राधान्याने करावीत, अशी अपेक्षा रहिवाशांनी ठेवली आहे.

हे ही वाचा:

एअर इंडियाची घरवापसी निश्चित

सिटी बँक गैरव्यवहार प्रकरणी आनंद अडसूळ यांना दिलासा नाही

शशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात

यंदाही नियमांचा नवरात्रोत्सव!

एक आजीबाई विमानप्रवास करत असताना ढगांच्या अडथळ्यामुळे विमान हवेत थडथडू लागले. त्यावेळी आजीबाईंनी म्हटले ‘बाई गं! खड्ड्यांची डोंबिवली आली की काय? मेल्यांनी हवेत पण डोंबिवलीचे दर्शन घडवले’, फळांचा रस तयार करण्यासाठी एका व्यक्तीने फळे मिक्सरच्या भांड्यात ठेऊन दुचाकीवरून डोंबिवलीमधील रस्त्यांवरून प्रवास केल्यावर एका तासात फळांचा रस बनला, पाण्यात लवकर विरघळणारे पदार्थ कोणते, असा प्रश्न विचारला असता विद्यार्थ्यांनी मीठ, साखर अशी उत्तरे दिली. मात्र, एका मुलाने कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांवरील खड्डे असे उत्तर दिले, चंद्रावरील खड्डे आणि कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांवरच्या खड्ड्यांमधील साधर्म्य शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी विशेष अभ्यास सुरू केला आहे, एका प्रवाशाने कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांवरून प्रवास केल्यामुळे त्याची पाठदुखी बरी झाली, अशा प्रकारचे मीम्स सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

समाज माध्यमांवरील कल्पकतेला तोड नाही हे या मीम्स वरून दिसून येते. खड्डे बुजवा असे वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना तरुणांकडून अशा विनोदी आणि अनोख्या शैलीतून खड्डे बुजवण्यासाठी आठवण करून दिली जात आहे.

Exit mobile version