मुंबई शहरामध्ये सर्रासपणे गुटखा विक्री होत असून गुटख्याच्या सेवनाने नागरिकांना विविध आजरांशी सामना करावा लागत आहे. मुंबईमध्ये गुटखा विक्री बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. गुटखा विक्री करणाऱ्यांवर आणि खरेदी करणाऱ्यांवर कायदेशीर करत मुंबई शहर गुटखा मुक्त करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी अन्न व औषध विभाग आयुक्तांना याबाबत पत्र लिहिले आहे. मुंबई शहर गुटखा मुक्त करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. राजेश शर्मा यांनी पत्रात लिहिले की, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, मुंबईमध्ये गुटखा विक्रीवर बंदी आहे.
हे ही वाचा:
केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर पण मुक्काम तुरुंगातच!
राहुल गांधी यांचे अग्निवीरबाबतचे आरोप बिनबुडाचे असल्याचे माजी अधिकाऱ्याने केले स्पष्ट
विधान परिषदेचे मतदान सुरू; कोण मारणार बाजी?
नेपाळमध्ये भूस्खलन होऊन प्रवाशांनी भरलेल्या दोन बस गेल्या नदीत वाहून
मात्र, असे असतानाही सर्वत्र राजरोसपणे कुठल्या भीतीशिवाय पथ विक्रेते गुटखा विक्री करीत आहे. प्रामुख्याने रुग्णालय, शाळा, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारपेठ अशा वर्दळीच्या ठिकाणी सर्रासपणेगुटखा विक्री होत आहे. गुटख्यामुळे सर्वसामान्य जनतेला, कॅन्सर, पाचन समस्या इत्यादी दुर्धर आजरांना सामोरे जावे लागते. गुटख्यांमुळे कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, परिणामी त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकटे ओढवली आहेत.
अन्न व औषध विभाग आयुक्त म्हणून आपण गुटखा विक्री विरुद्ध कठोर निर्णय घेवून गुटखा खरेदी करणारा आणि विक्री करणारा अशा दोघांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच मुंबईमध्ये गुटखा इतक्या मोठ्या प्रमाणावर कुठून येतो याचाही तपास करून संबंधितांवर कार्यवाही करावी आणि मुंबई शहर गुटखा मुक्त करावे, अशी मागणी राजेश शर्मा यांनी केली आहे.