24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषउत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात; दिब्रूगड एक्स्प्रेसचे १० डबे घसरले

उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात; दिब्रूगड एक्स्प्रेसचे १० डबे घसरले

मदतकार्याला सुरुवात; रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दिब्रूगड एक्स्प्रेसला हा भीषण अपघात होऊन १० डबे रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड येथून निघालेल्या दिब्रूगड एक्स्प्रेसला अपघात झाला. डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झाली आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

चंदीगड- दिब्रूगड एक्सप्रेसचा अपघात झाला असून गाडीचे १० डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहेत तर, काही जण जखमी झाले आहेत. दुपारी २.३० च्या सुमारास हा अपघात झाल्याचं एका प्रवाशाने सांगितलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अपघातग्रस्त डब्यांमध्ये प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे गोरखपूर ते लखनौ डाऊन दिशेच्या रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत. सहा ते सात रेल्वेगाड्या रूळ रिकामा होण्याची वाट पाहत उभ्या आहेत. रेल्वेप्रशासनाने प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी केला आहे. ८९५७४०९२९२, ८९५७४००९६५ हे दोन हेल्पलाईन नंबर रेल्वेने जारी केले आहेत.

हे ही वाचा:

जगातील लोकसंख्येला मुस्लिम जबाबदार, भारतातही तीच परिस्थिती !

बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला!

आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डींच्या पक्षाच्या नेत्याची भररस्त्यात हत्या !

कावड यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थाच्या दुकानावर मालकाचे नाव लिहा!

आरपीएफ व रेल्वे अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाचंही एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. यासह वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आलं असून डब्यांमध्ये डकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा