27 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरविशेषरत्नागिरीत वायू गळती, ३० हून अधिक विद्यार्थ्यांना श्वसनासह उलट्यांचा त्रास!

रत्नागिरीत वायू गळती, ३० हून अधिक विद्यार्थ्यांना श्वसनासह उलट्यांचा त्रास!

विद्यार्थांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल

Google News Follow

Related

रत्नागिरीच्या जयगडमधील जिंदाल कंपनीतून वायू गळती झाल्याची दुर्घटना घडली आहे. वायू गळतीमुळे जयगड येथील नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वायुगळतीचा मोठा त्रास झाला आहे. वायू गळतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वायू गळतीमुळे ३०-४० विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास होत आहे.विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिंदाल कंपनीच्या टाक्यांचे काम सुरु असताना वायू गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. इथाईल स्वरूपाचा हा  वायू असलायचे कळतंय. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन मुलींना अतिदक्षता विभागात नेण्यात आले आहे. जेव्ह वायू गळतीची घटना घडली, तेव्हा शाळेमध्ये जवळपास २०० हून अधिक मुले होती. विद्यार्थांना त्रास होण्यास सुरुवात होताच मुलांचे पालक मिळेल त्या गाडीने रुग्णालयात धाव घेत आहेत.

हे ही वाचा : 

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला २५ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल!

बस थांबवून चालकाने विकत घेतली दारू; कुर्ला घटनेची पुनरावृत्ती होणार?

प्रतापगडच्या पायथ्याशी पुन्हा झाले अतिक्रमण

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा