भायखळ्यात लाकडाच्या वखारीला भीषण आग

भायखळ्यात लाकडाच्या वखारीला भीषण आग

मुंबईतील भायखळा येथे सोमवारी सकाळी भीषण आग लागल्याची बाब समोर आली आहे. माझगाव भायखळा परिसरामधील सप्तश्री मार्गावर लाकडी फर्निचरच्या गोदामाला आणि दुकानांना आग लागली. ही आग मोठ्या स्वरुपाची होती. तब्बल दहा ते बारा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.

भायखळा परिसरातील सप्तश्री मार्गावरील मुस्तफा बाजार परिसरातील लाकडाच्या वखारीत सोमवारी १० जानेवारी रोजी ही आग लागली. ही आग लेवल दोन स्वरुपाची होती. भायखळा परिसरात मोठ्या प्रमाणात वखारीचे मार्केट आहे. यातील एका गोदामाला आणि काही दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

हे ही वाचा:

आजपासून यांना मिळणार बूस्टर डोस

गुरु गोविंदसिंग यांच्या सुपुत्रांचा बलिदान दिन आता ‘वीर बाल दिवस’

पाकिस्तानातील मुरी येथे बर्फवृष्टीमुळे वाहनांत अडकून पर्यटक मृत्युमुखी

अजबच! ‘भाजपाशी लढण्यासाठी निवडणूक आयोगाने आम्हाला मदत करावी’

भायखळा येथे लागलेल्या आगीमध्ये नेमके किती नुकसान झाले यांसदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. २०१९ मध्ये मुस्तफा बाजार परिसरतील एका गोडाऊनला अशीच भीषण आग लागली होती. त्या आगीमध्ये कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल सहा तास लागले होते.

Exit mobile version