क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी (२ जानेवारी) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली आहे. ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेता नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट खेळाडू प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासह ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा स्वप्नील कुसाळेचाही समावेश आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, समितीच्या शिफारशी आणि सरकारने केलेल्या तपासणीच्या आधारे खेळाडू, प्रशिक्षक, विद्यापीठांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह ५ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त होणार असून त्यापैकी २ आजीवन कामगिरीसाठी आहेत. यामध्ये स्वप्नील कुसाळे यांच्या गुरु दिपाली देशपांडे यांचाही सामावेश आहे.
दरम्यान, खेलरत्न पुरस्काराच्या यादीतून मनू भाकरला वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. यावरून मनू भाकरचे वडील आणि प्रशिक्षक, जसपाल राणा यांनी या निरीक्षणाबद्दल निराशा व्यक्त केली होती. मात्र, क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या पुरस्काराच्या यादीत मनू भाकरचे नाव आहे. त्यामुळे यादीतून मनू भाकरचे नाव वगळण्यात आल्याच्या अफवा दूर झाल्या आहेत.
हे ही वाचा :
४५० कोटींच्या चिट-फंड घोटाळ्याप्रकरणी शुभमन गिलसह चार खेळाडूंना समन्स
बीएसएफकडून बांगलादेशातून घुसखोरीला परवानगी
“दिल्लीचे सरकार खोटे आणि लुट करणारे सरकार”
बांगलादेशी महिला चक्क पश्चिम बंगालमध्ये बनली सरपंच!
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२४
- गुकेश डी (बुद्धिबळ)
- हरमनप्रीत सिंह (हॉकी)
- प्रवीण कुमार (पॅरा-ॲथलेटिक्स)
- मनु भाकर (शूटिंग)
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार
- ज्योती येराजी (ऍथलेटिक्स)
- अन्नू राणी (ऍथलेटिक्स)
- नितू (बॉक्सिंग)
- सविती (बॉक्सिंग)
- वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
- सलीमा टेटे (हॉकी)
- अभिषेक (हॉकी)
- संजय (हॉकी)
- जर्मनप्रीत सिंह (हॉकी)
- सुखजीत सिंह (हॉकी)
- राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी)
- प्रीती पाल (पॅरा-ॲथलेटिक्स)
- जीवनजी दीप्ती (पॅरा-ॲथलेटिक्स)
- अजित सिंह (पॅरा-ॲथलेटिक्स)
- सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा-ॲथलेटिक्स)
- धरमबीर (पॅरा-ॲथलेटिक्स)
- प्रणव सूरमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
- एच होकातो सेमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
- सिमरन (पॅरा-ॲथलेटिक्स)
- नवदीप (पॅरा-ॲथलेटिक्स)
- नितेश कुमार (पॅरा-बॅडमिंटन)
- सुश्री तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा-बॅडमिंटन)
- नित्या श्री सुमथी सिवन (पॅरा-बॅडमिंटन)
- मनिषा रामदास (पॅरा-बॅडमिंटन)
- कपिल परमार (पॅरा-जुडो)
- मोना अग्रवाल (पॅरा-शूटिंग)
- सुश्री रुबिना फ्रान्सिस (पॅरा-शूटिंग)
- स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
- सरबज्योत सिंह (शूटिंग)
- अभय सिंह (स्क्वॅश)
- साजन प्रकाश (स्विमिंग)
- अमन (कुस्ती)
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन श्रेणी)
- सुचा सिंह (ऍथलेटिक्स)
- मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार
- सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
- दीपाली देशपांडे (शूटिंग)
- संदीप सांगवान (हॉकी)
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)
- एस मुरलीधरन (बॅडमिंटन)
- अरमांडो अग्नेलो कोलाको (फुटबॉल)