राणीच्या बागेत पाळले जाताहेत ‘पांढरे हत्ती’

राणीच्या बागेत पाळले जाताहेत ‘पांढरे हत्ती’

मुंबईच्या राणीच्या बागेत ज्या परदेशी पाहुण्याला आणले, तो आता पांढरा हत्ती ठरू पाहात आहे.

२०१७ मध्ये दक्षिण कोरियामधून पेंग्विनचे आगमन झाले होते. पेंग्विनमुळे राणीच्या बागेची शोभा वाढली. मात्र या पेंग्विनच्या देखभाल आणि काळजीचा खर्च खूप जास्त आहे. सन २०२१ ते २०२४ या तीन वर्षांसाठी पेंग्विनच्या देखभालीचा आणि आरोग्य विषयक खर्चासाठी तब्बल १५ कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. मागील तीन वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खर्चात पाच कोटींची वाढ झाली आहे.

दक्षिण कोरियामधून २०१७ मध्ये आठ हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. त्यापैकी एका पेंग्विनचा आणल्यानंतर दोन महिन्यांतच मृत्यू झाला होता. सध्या राणीच्या बागेत सात पेंग्विन असून दोन पिल्ले आणि पाच मोठे पेंग्विन आहेत. पेंग्विन आणल्यानंतर त्यांच्या होणाऱ्या खर्चावरून मोठा राजकीय वाद झाला होता. तसेच मुंबईतील दमट वातावरणात पेंग्विन फार काळ तग धरू शकणार नाहीत, असाही दावा करण्यात आला होता.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण

अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र

दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर

जितेंद्र आव्हाडांच्या ‘कथित’ ऑडियो क्लिपमुळे ‘साहेबांचे’ महिला धोरण पुन्हा चर्चे

२०१७ मध्ये राणीच्या बागेत पेंग्विन कक्ष उभारण्यासाठी दहा कोटींचा खर्च करण्यात आला होता; तर पेंग्विन खरेदीसाठी अडीच कोटी रुपये खर्च आला होता. दहा कोटींचा खर्च करून पालिकेने अंटार्टिका खंडाच्या वातावरणाच्या धर्तीवर अत्युच्च दर्जाची सुविधा राणीच्या बागेत उपलब्ध करून दिली. दरम्यानच्या काळात पेंग्विन पाहण्यासाठी लोकांनीही राणीच्या बागेत मोठी गर्दी केली. प्रवेश शुल्कातून पालिकेला सुमारे २० ते २५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मात्र दुसरीकडे पेंग्विन देखभालीच्या खर्चातही वाढ झाली आहे.

तीन वर्षांपूर्वी १० कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. ते कंत्राट ७ सप्टेंबर २०२१ रोजी संपले. त्यामुळे आता २०२१ ते २०२४ साठी १५ कोटी २६ लाख २३ हजार ७२० रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. तीन वर्षाच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी आणि देखभालीसाठी ही निविदा असून प्रशासकीय प्रक्रिया सुरू सुरू आहे, असे राणी बागचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

Exit mobile version