23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषस्त्री शक्तीचा जागर: त्यागाचे रूप माई सावरकर

स्त्री शक्तीचा जागर: त्यागाचे रूप माई सावरकर

Google News Follow

Related

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये स्त्री शक्तीच्या विविध रूपांना पूजले जाते. निडर, शौर्य, नेतृत्व अशा अनेक प्रकृतींना आठवत असतानाचं स्त्री शक्तीचं आणखी एक रूप म्हणजे त्याग. अशाच त्यागाच्या प्रकृतीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यमुनाबाई सावरकर.

यमुनाबाई सावरकर म्हणजे माई सावरकर… स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी आणि जव्हार संस्थानचे तत्कालीन रामचंद्र त्र्यंबक उपाख्य भाऊसाहेब चिपळूणकर यांच्या ज्येष्ठ कन्या. यमुनाबाई या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या खडतर अशा जीवनप्रवाहाशी एकरूप होऊन जगल्या.

नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे चिपळूणकर घरात यशोदाबाईंचा जन्म ४ डिसेंम्बर १८८८ साली झाला. घरची परिस्थती सधन होती. जेमतेम चौथीपर्यंत शिकलेल्या यशोदाबाई १९०१ साली सावरकरांच्या घरात विनायकराव यांच्या पत्नी म्हणून आल्या आणि सावरकरांची अगदी सावली बनल्या. त्यांना सावरकर करत असलेल्या देश कार्याची माहिती होती. त्यामुळे त्या घर सांभाळताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी कसे कामी येऊ यासाठी प्रयत्नशील असायच्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेले पोवाडे, देशभक्तीची पदे आपल्या कुटुंबातील स्त्रियांकडून म्हणून घेत. येसू वहिनींना म्हणजेच त्यांच्या थोरल्या जाऊबाईंना ते त्यांचा अर्थ समजावून सांगत. पुढे क्रांती कार्याचा प्रचार करण्याच्या हेतूने ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ नावाची महिलांची संस्था स्थापन केली गेली. यामाध्यमातून यमुनाबाई केसरीतील लेखांचं सामूहिक वाचन करून घेत, स्वदेशी चा प्रचार, प्रसार करत.

रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शुद्धी चळवळ सुरू केली होती. परधर्मातील लोक स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारू पाहात होते. अशा समारंभात शुद्ध होणाऱ्या महिलांना हिंदु समाजात रुळवण्यासाठी यमुनाबाई त्यांना सहभोजन आणि हळदीकुंकू समारंभाचे आमंत्रण देत. तेथे त्यांचा ओटी भरून सत्कार करत. ख्रिश्चन झालेल्या कुटुंबियांना शुद्ध करून घेतल्यानंतर त्यांच्या मुलांची मुंज आणि लग्ने लावून देत. नाशिकला झालेल्या अनेक समारंभात त्यांनी स्त्रियांना धीट होण्याचा उपदेश केला.

हे ही वाचा..

झाकीर नाईकची व्हिडीओवर संतापाची लाट

मालदीवसाठी भारत सर्वात मोठे पर्यटन स्रोत

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आरोपींवर १० लाखांचं बक्षीस!

सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनमधून करणार मतदान

१९०६ साली सावरकर लंडनला रवाना झाले. १९०९ साली यमुनाबाई यांचा पुत्र प्रभाकर याचा मृत्यू झाला. पती परदेशी असताना यमुनाबाईंनी या संकटाला एकटीने धीराने तोंड दिलं. पुढे हा संकटांचा पाढा सुरूचं राहिला. सावरकरांना लंडनमध्ये अटक झाली. नाशिकला घरावर जप्ती आली आणि सावरकर कुटुंबाची वाताहत झाली. तात्या अंदमानमध्ये होते तो काळ यमुनाबाईंसाठी अत्यंत खडतर होता. १९२४ मध्ये सावरकरांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलं आणि त्यांना रत्नागिरी येथे कुटुंबासमवेत राहण्याची परवानगी मिळाली. या काळात सावरकरांनी समाजसुधारणेची मोठी चळवळ हाती घेतली होती. माई या चळवळीत सहभागी झाल्या. विशेषतः जातिभेद निर्मूलनाच्या कामात त्या पुढे असायच्या. १९६३ साली आजारपणात त्यांचे निधन झाले. पण वियोग, पुत्र शोक, घरावर जप्ती कुठलीच परिस्थिती त्यांना सावरकरांच्या आखलेल्या कामापासून आणि त्यांच्या ध्येयापासून दूर करू शकली नाही. अशा या त्यागाच्या शक्तीला नमन!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा