माहुल परिसरात ‘अवजड’ झाले ओझे!

माहुल परिसरात ‘अवजड’ झाले ओझे!

चेंबूरमध्ये तेल कंपन्या तसेच गॅस कंपन्या असल्यामुळे टॅंकरमुळे आता वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. चेंबूरमधील माहूल परिसरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, टाटा वीज केंद्र यासोबत चेंबूरच्या माहुल तसेच गडकरी खाण परिसरात अनेक खासगी तेल तसेच गॅस कंपन्या आहेत. याकारणांमुळे या विभागात हजारो टॅंकरची ये-जा सुरू असते. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेली आहे.

सदर टॅंकरना पार्क करण्यासाठी परिसरात एक भूखंड आरक्षित करण्यात आलेला आहे. परंतु हा भूखंड मेट्रोच्या कामासाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दिवसभर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आता टॅंकरच्या पार्किंगचा भूखंड मेट्रोच्या ताब्यातून परत घ्यावा अशी मागणी स्थानिक पालिकेकडे करत आहेत.

या परिसरामध्ये दिवसाला दोन ते तीन हजार अवजड वाहनांची ये जा सुरू असते. वाहनांचा नंबर लागेपर्यंत त्यांना गेटबाहेरच थांबावे लागते. चेंबूरच्या शंकर देऊळ, माहुल गाव आणि गडकरी मार्गाकडे जाताना त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. ही अवजड वाहने अनेकदा रस्त्यांवर उभी केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. त्यामुळेच स्थानिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

 

हे ही वाचा:

आता नवीन प्रशिक्षकपदी द्रविडची नियुक्ती निश्चित

२४ वर्षांची महिला बनली २१ मुलांची आई!

रिझवानने हिंदूंसमोर नमाज अदा केला ही खास बाब

नवाब मालिकांविरोधात फौजदारी गुन्हा?

 

मेट्रोला या अवजड वाहनांसाठी पार्किंचा भूखंड देण्यात आला होता. ती मूदत आता संपत आल्यामुळे स्थानिक हा भूखंड लवकरात लवकर ताब्यात घ्यावा अशी मागणी करत आहेत. सदर भूखंड ताब्यात घेऊन या जागी तात्काळ आता अवजड वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात यावी अशी मागणी आता स्थानिकांमध्ये जोर धरू लागलेली आहे. याकरता आता मुख्यमंत्री, पालकमंत्री, महापौर आणि पालिक आयुक्तांना देखील पत्र पाठविण्यात आलेले आहे.

Exit mobile version