महिंद्रा कंपनीने नुकतीच स्कॉर्पिओ-एन सोबत स्कॉर्पिओ क्लासिक देखील सादर केली आहे. या दोन्ही एसयूव्हीला बाजारात चांगलीच पसंती मिळत आहे. कंपनीकडे स्कॉर्पिओ श्रेणीतील सुमारे १ लाख ३० हजार युनिट्सच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.
महिंद्राची देशातील आघाडीची स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही ) उत्पादक म्हणून ओळख आहे, कंपनी या विभागातील अनेक वाहनांची विक्री करते. गेल्या काही महिन्यांत, महिंद्राने आपल्या नवीन स्कॉर्पीप-एन पासून एक्सयूव्ही पर्यंत अनेक नवीन मॉडेल बाजारात आणले आहेत. उत्कृष्ट फीचर्स आणि मस्क्युलर लुकने सजलेल्या या नव्या एसयूव्ही वाहनांनी बाजारात आल्यानंतर लोकां मध्ये खूप उत्सुकता दाखवली आहे. कंपनीच्या एसयूव्ही गाड्यांचे बुकिंग असे आहे की,२ लाख ६० हजार अधिक वाहनांची ऑर्डर कंपनीकडे प्रलंबित आहे, ज्यांचे ग्राहक डिलिव्हरीची आतुरतेने वाट पाहत आहेत. नियामक फाइलिंगनुसार, १ नोव्हेंबरपर्यंत, महिंद्राने एकूण २ लाख ६० हजार वाहन बुकिंगची नोंदणी केली होती. यामध्ये स्कॉर्पिओ-एन, स्कॉर्पिओ क्लासिक, थार, एक्सयूव्ही-७०० आणि एक्सयूव्ही-३०० यांचा समावेश आहे. तथापि, बुकिंगचा आकडा मॉडेलनुसार बदलतो. सर्वाधिक मागणी असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ रेंजमध्ये अनुक्रमे १ लह ३० हजार युनिट्स, एक्सयूव्ही-७०० साठी, ८० हजार युनिट्स, थारसाठी, २० हजार युनिट्स बोलेरोसाठीची प्रतीक्षा यादी आहे.
हे ही वाचा:
समाजवादीचे नेते अबू आझमी आयकर विभागाच्या रडारवर
१५ दिवसांपूर्वीच आफताबचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले होते
ठाकरे गटाला धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळली
विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
याशिवाय, कंपनीने एक्सयूव्ही-७०० साठी ११ हजार युनिट्स, थारसाठी ४ हजार नऊशे युनिट्स,एक्सयूव्ही-३०० साठी ६ हजार चारशे युनिट्स, बोलेरो आणि बोलेरा निओसाठी ८ हजार तीनशे युनिट्सची मासिक बुकिंग नोंदवली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कंपनीने आतापर्यंत सर्वाधिक ५३ हजार वाहनांचे बुकिंग नोंदवले होते.