४१ मौल्यवान जीवांना वाचवणाऱ्या व्यक्तींचे महिंद्रा यांनी मानले आभार

बचाव कार्यातील यशाबद्दल आनंद महिंद्रांची पोस्ट

४१ मौल्यवान जीवांना वाचवणाऱ्या व्यक्तींचे महिंद्रा यांनी मानले आभार

उत्तराखंडमधील सिल्क्यरा येथे बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ मजुरांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी रॅट मायनर्स टीमच्या मदतीने शेवटचा भाग हाताने खोदण्यात आला; त्यानंतर मजुरांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मजूर बाहेर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बचाव पथकाच्या धाडसाचे आणि मेहनतीचे कौतुक केले आहे. दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही बचावकार्यात सहभागी झालेल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत लिहिले आहे की, “ही कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आहे. १७ दिवसांपासून ४१ मौल्यवान जीवांना वाचवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे मी आभार मानतो. हे यश कोणत्याही खेळातील विजयापेक्षा जास्त अधिक मोठे आहे. तुम्ही सर्वांनी देशाचा उत्साह वाढवला आहे. आपण आम्हाला जाणीव करून दिली आहे की, कोणत्याही बोगद्यातून बाहेर पडणे फार कठीण नाही. सर्वांचे सहकार्य, प्रार्थना आपल्याबरोबर असतील, तर कोणतेही कार्य अशक्य नसते.”

हे ही वाचा:

सरकारने ७० लाख मोबाईल नंबर केले रद्द!

‘शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख असे पदच नाही’

‘भारताने हमासला प्रतिबंधित संघटना म्हणून जाहीर करावे’!

सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पीएफ घोटाळा प्रकरणी गुन्हा

आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर अनेक वापरकर्त्यांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, सर, तुमचं मत बरोबर आहे. या कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला माझा सलाम! यातील प्रत्येकानं खूप चांगलं काम केलं आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, त्या कामगार-कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून छान वाटले.

Exit mobile version