भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी लाल किल्ल्यावर पंचायती राज संस्थांच्या सुमारे ४०० महिला प्रतिनिधींना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. पंचायती राज मंत्रालयाकडून मंगळवारी (१३ ऑगस्ट) याबाबत निवेदन जारी करण्यात आले. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे ४५ लखपती दीदी आणि सुमारे ३० ड्रोन दीदी यांना देखील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. बुधवारी ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
नमो ड्रोन दीदी आणि लखपती दीदी योजना ही ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक स्वायत्तता वाढवण्यासाठी सरकारच्या महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक आहे. नमो ड्रोन दीदी योजनेंतर्गत महिला बचत गटांना ड्रोन खरेदीवर सबसिडी दिली जाते. दरम्यान, बुधवारी (१४ ऑगस्ट) यांच्यासाठी एक राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला पुद्दुचेरीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर आणि नवज्योती इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक किरण बेदी आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी संबोधित करणार आहेत.
हे ही वाचा:
“मनोज जरांगे हे बिनबुडाचा लोटा”
आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलिसांवर मुस्लीम समुदायाचा हल्ला
‘पाकिस्तान विलीन होईल किंवा नष्ट होईल’
केजरीवालांना दिलासा नाहीच; अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
दरम्यान, १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला अनेक प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. लाल किल्ल्यावर सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. देशभरात ‘तिरंगा रॅली’ काढण्यात येत आहे.