चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ६३ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. चेन्नई सुपर किंग्जचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल असा सूर मारून झेल पकडला. चेन्नई सुपर किंग्जकडून आठवे षटक टाकण्यासाठी डॅरिल मिशेल गोलंदाजीसाठी आला. स्ट्राइकवर विजय शंकर. विजय शंकरने बाहेर जाणाऱ्या चेंडूला फटका मारला. बॅटची कड घेऊन चेंडू माहीपासून बराच दूर होता. पण हार मानेल तो माही कुठला. माजी भारतीय कर्णधाराने सूर मारून शानदार सुपरमॅनसारखा हा झेल घेतला.
महेंद्रसिंग धोनीचा झेल सोशल मीडियावर व्हायरल
महेंद्रसिंग धोनीचा हा झेल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सातत्याने कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर क्रिकेटचाहते म्हणतात की, वय हा फक्त एक आकडा आहे. माही ४२ वर्षांचा झाला असला तरी त्याचा फिटनेस एखाद्या तरुण खेळाडूला लाजवणारा आहे.
हेही वाचा :
म्हणे `नागरिकतेचा पैस` आकसतो आहे !
गुजरातच्या पराभवानंतर शुभमनला १२ लाखांचा दंड
६ कोटी नेटकऱ्यांचे ‘विराट’ सर्च
चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत अव्वल
चेन्नई सुपर किंग्जचे २ सामन्यात सलग २ विजयांसह ४ गुण झाले आहेत. सीएसके गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऋतुराज गायकवाडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला २० षटकांत ८ बाद १४३ धावा करता आल्या.