25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषमहेश मांजरेकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट का सोडला?

महेश मांजरेकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट का सोडला?

मांजरेकरांनी सांगितली कहाणी

Google News Follow

Related

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.अभिनेता आणि दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रथमतः अभिनेते महेश मांजरेकर करणार होते.मात्र, त्यांनी माघार घेताच अभिनेता रणदीप हुड्डा पुढे सरसावत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलं.दरम्यान,’स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट का सोडला यावर महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले आहे.

महेश मांजरेकर म्हणाले की, मी जेव्हा चित्रपट सोडला तेव्हा माझ्यावर बरीच टीका झाली.वीर सावरकरांचे विचार पटत नसल्याने चित्रपट सोडला अशी टीका माझ्यावर करण्यात आली.त्यावेळी मी काहीच बोललो नाही.मात्र, आता चित्रपट प्रदर्शित झाला आहे तर मी स्पष्ट बोलतो.मला सावरकर यांच्याविषयी प्रचंड आकर्षण आहे. वीर सावरकरांवरील बायोपिक हा माझा प्रोजेक्ट होता.त्यासाठी मी निर्माते आनंद पंडित आणि संदीप सिंह यांची निवड केली.त्यानंतर मुख्य भूमिकेसाठी रणदीपची निवड झाली.

हे ही वाचा.. 

रामनवमीनिमित्त अयोध्या नगरीत रामभक्तांची अलोट गर्दी

दाऊद छोटा शकील गँगच्या नावे एकनाथ खडसेंना धमकीचे फोन

कोलकात्याच्या सुनील नारायणची राजस्थानविरुद्ध दमदार खेळी

विहिंप नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन दहशतवाद्यांना अटक

चित्रपटाचे ७० टक्के स्क्रिप्ट माझे आहे.दरम्यान, स्क्रिप्टच्या वेळी अभिनेता रणदीप हुड्डाने अनेक बदल सुचवले.मात्र, त्यामुळे शूटिंग लांबलं आणि बजेटमध्ये देखील वाढ होऊ लागली होती.चित्रपटात मला कोणाचाही हस्तक्षेप नको होता. कारण त्याचं यश किंवा अपयश यासाठी मी जबाबदारी घ्यायला पूर्णपणे तयार होतो. मला कोणालाही दोष द्यायचा नव्हता”, असे महेश मांजरेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, चित्रपटात रणदीपला हिटलर, इंग्लडचा राजा, इंग्लंडचा पंतप्रधान हे सर्वे होते.स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हा लोकमान्य टिळकांचा भागही त्याला हवा होता.सावरकरांच्या बायोपिकशी याचा काहीही संबंध नसल्याने मी सुद्धा गोंधळून गेलो होतो.तसेच भगत सिंग आणि सावरकर यांच्यातील एक दृश्य देखील रणदीपला हवा होता.मी रणदीपच्या प्रामाणिकपणाबद्दल प्रश्न उपस्थित करत नाहीये.पण मला माझ्या पद्धतीने चित्रपट बनवायचा होता आणि ते सर्व जुळून येत नव्हते.त्यामुळे मी चित्रपटातून माघार घेतली, असे महेश मांजरेकर यांनी सांगितले.दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाने आतापर्यंत २० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा