26 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरविशेषमहेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान

महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान

Google News Follow

Related

सुप्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मूत्राशयाचा कर्करोग झाला असून नुकतीच मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची शस्त्रक्रिया झाली. यानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे वृत्त ईटी टाईम्सने दिले आहे. सध्या महेश मांजरेकर यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. महेश मांजरेकर किंवा कुटुंबीयांकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.

महेश मांजरेकर यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मराठीतील अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. आजघडीला मराठीतील एक प्रथितयश दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर यांचे नाव घेतले जाते. याशिवाय, बॉलीवूडमध्येही महेश मांजरेकर हे नाव सुपरिचित आहे. ‘वॉन्टेड’, ‘रेडी’, ‘दबंग’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’ आणि ‘काँटे’ यासारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर यांनी ‘व्हाईट’ या चित्रपटाची घोषणा केली होती.

हे ही वाचा:

काबुल विमानतळावर चेंगराचेरीत जिवीत हानी

ठाकरे सरकार हे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे

माझा कोणावरही विश्वास नाही

तालिबानचे हजारो दहशतवादी लवकरच पंजशीरमध्ये जाणार?

महेश मांजरेकरांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक प्रसिद्ध सिनेमे दिग्दर्शित तसेच निर्मित केले आहेत. यातील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी स्वतः भूमिका देखील साकारल्या आहेत. यामध्ये मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श यासारखे सिनेमे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा