‘हिंदुत्व धर्म नही इतिहास है’! ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

‘हिंदुत्व धर्म नही इतिहास है’! ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

आज देशभरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी होत आहे. अशातच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. मांजरेकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चरित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुडा स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणार आहे.

महेश मांजरेकर यांनी हुडाच वीर सावरकरांच्या वेशातला फोटो प्रसिद्ध केला आहे. ‘हिंदुत्व धर्म नही इतिहास है’ असे या पोस्टरमध्ये लिहिले आहे. पोस्टर वरील फोटोत दिसणारा रणदीप हुडा सावरकरांच्या वेशात अगदी शोभून दिसत आहे हुडा छाया लोक असे प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटाचे शूटिंग येत्या ऑगस्टमध्ये सुरु होत आहे. तर लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हे ही वाचा:

प्रियांका गांधी दिसणार राज्यसभेत?

जवानांना घेऊन जाणारी बस नदीत पडली, ७ जवान मृत

वीरप्पन गॅंग फुल फॉर्ममध्ये! मलनिस्सारण विभागात २१ हजार कोटींचा घोटाळा

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौटालांना चार वर्षांचा तुरुंगवास

बॉलिवूड निर्माते संदीप सिंह हे स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट साकारत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक मराठमोळे महेश मांजरेकर करणार आहेत. तर स्वतः महेश मांजरेकर यांनीच रिशी विरमानी यांच्यासोबत या चित्रपटाचे लेखन सुद्धा केले आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना रणदीप हुडा यांनी असे म्हटले आहे की, “काही कथा सांगितल्या जातात पण काही कथा या जगल्या जातात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनपटाचा भाग असण्याबद्दल मी उत्साही आहे तसेच ही एक अभिमानाची बाब आहे”

Exit mobile version