साक्षी वहिनींनंतर धोनीने उचलून घेतलेला मी बहुतेक एकटाच भाग्यवान!

साक्षी वहिनींनंतर धोनीने उचलून घेतलेला मी बहुतेक एकटाच भाग्यवान!

आयपीएलमध्ये खेळाडू मैदानावर आपली छाप पाडत असतात. तर मैदानाबाहेरही अनेक गंमतशीर गोष्टींमुळे ते चर्चेत येतात. चेन्नई सुपर किंग्जच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये गंमतीशीर किस्सा घडला. यामध्ये चेन्नईचे खेळाडू अनेक मजेशीर गोष्टी सांगताना दिसले. या कार्यक्रमात रवींद्र जडेजाने सांगितलेल्या किश्श्याने उपस्थित असलेले सर्वांमध्ये हशा पिकला.

रवींद्र जडेजा काय म्हणाला?
जेव्हा जडेजा स्टेजवर आला तेव्हा तो म्हणाला, मला वाटते साक्षी भाभीनंतर कदाचित मी एकटाच आहे, ज्याला माहीने उचलून घेतले असेल. या किश्यानंतर उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. जडेजाचा हा मजेशीर किस्सा होता आयपीएल २०२३ ची फायनल जिंकल्याच्या त्या संस्मरणीय क्षणाचा. शेवटच्या चेंडूवर सर रवींद्र जडेजाने चेन्नईला सणसणाटी विजय मिळवून दिला होता. तेव्हा माहीने त्याला उचलून घेतले होते. त्याचा व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला होता.

धोनीनेही सर्वांना हसवले
या हास्याच्या वातावरणात धोनीनेही आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले. रवींद्र जाडेजाने कॅच सोडल्याबद्दल त्याला विचारले असता. माही गमतीने म्हणाला, आता नवा कर्णधार आहे!

हेही वाचा :

रशियन सरकारने अटक केली सहा पत्रकारांना !

आयपीएलमध्ये राजस्थानचा सलग दुसरा विजय

गरजू कैद्यांसाठी वकिलांचे ‘दर्द से हमदर्द तक’

मुख्तारचा एक मुलगा तुरुंगात, दुसरा जामिनावर बाहेर; पत्नीवरही ७५ हजारांचे बक्षीस

आयपीएल २०२४ मध्ये सीएसकेची कामगिरी
आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामने जिंकून या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. सीएसकेचा पहिला सामना २२ मार्च रोजी आरसीबीविरुद्ध होता. सीएसकेने हा सामना सहा गडी राखून जिंकला. दुसरा सामना २६ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होता. सीएसकेने हा सामना ६३ धावांनी जिंकला.

चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा सामना
चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा सामना ३१ मार्चला होणार आहे. विशाखापट्टणमच्या क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सीएसकेचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. यानंतर सीएसकेचा चौथा सामना ५ एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.

Exit mobile version