30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषमहायुती सरकारचा बळीराजाला दिलासा; पिकांच्या नुकसानीपोटी ५९६ कोटींची मदत जाहीर

महायुती सरकारचा बळीराजाला दिलासा; पिकांच्या नुकसानीपोटी ५९६ कोटींची मदत जाहीर

अवकाळी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान

Google News Follow

Related

राज्यात अवकाळी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने ५९६ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यावर्षी राज्यात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला होता. याचा मोठा फटका बळीराजाला बसला. यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ५९६ कोटी रुपयांची मदत दिली आहे.

अवकाळी पावसामुळे नाशिक विभागात ७३ हजार ५६७ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ४२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. अमरावती विभागातील २१ हजार ३६२ शेतकऱ्यांचे १ लाख ३८ हजार २५३ हेक्टरवर नुकसान झाले. महसूल विभागाच्या यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार नाशिक विभागातील नुकसानीपोटी १०८ कोटी २१ लाख रुपयांची मदत दिली जाईल. अमरावती विभागातील नुकसानीपोटी ३८२ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

नागपूर विभागातील ३ लाख ५४ हजार ७५६ शेतकऱ्यांच्या २ लाख १७ हजार ६९० हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले होते. त्यांना १०० कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. २ पीक कर्जाची वसुली बँकांनी करू नये पुणे विभागात २ हजार २९७ शेतकऱ्यांचे १६५७ हेक्टरवर नुकसान झाले होते. त्यांना ५ कोटी ८३ लाखांची मदत दिली जाणार आहे.

हे ही वाचा:

युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अकोल्यातील विद्यार्थिनीची दिल्लीत आत्महत्या

अतिरेकी संघटना हिजबुल्लाचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात पावसाचा प्रकोप; विविध घटनांमध्ये १६ लोकांचा मृत्यू

गांधी-वाड्रा परीवाराच्या धर्म-जातीबाबत लपवाछपवी का? |

नागपूर आणि अमरावती विभागामुळे ४८२ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाईल. निधी बँकांमध्ये जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची त्यातून वसुली बँकांनी करू नये असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय महसूल विभागाने शुक्रवारी जारी केला. दरम्यान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करु नये असे निर्देश देखील राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा