महायुतीला स्पष्ट बहुमत, १७५ जागा मिळतील!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा अंदाज

महायुतीला स्पष्ट बहुमत, १७५ जागा मिळतील!

विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीला संधी मिळणार यावरून राज्यभरात चर्चा सुरु आहे. एक्झिट पोलनुसार, महायुतीच बाजी मारणार असल्याचे चित्र आहे. याच दरम्यान, विधानसभा अध्यक्ष  राहुल नार्वेकर यांचे वक्तव्य समोर आले आहे. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून महायुतीला १७५ मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे भाजपचे कुलाब्यातील उमेदवारही होते. कुलाबामध्ये कमी मतदान झाल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, यावर ते म्हणाले, राज्यात सर्वात कमी मतदान कुलाबामध्ये झाले आहे. २०१९ मध्ये कुलाबामध्ये ३८ टक्के मतदान झाले होते. लोकसभा २०२४ मध्ये ४३ टक्के मतदान झाले आणि आता विधानसभा २०२४ मध्ये ४४.५९ टक्के झाले. हे समाधानकारण नाही पण टक्क्यात वाढ झाली आहे. यामध्ये वाढ होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआची आकडेवारी जवळपास समान दिसून दिसून येत असल्याचे त्यांना विचारण्यात आले. यावर राहुल नार्वेकर म्हणाले, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल. महायुतीला १७५ जागा मिळतील असा माझा अंदाज आहे, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

हे ही वाचा : 

अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपांनंतर अदानी समूहाकडून ६० कोटी डॉलर्सचे करार रद्द

बांगलादेशातील युनूस सरकारचा पर्दाफाश; अल्पसंख्य हिंदूंचा हिंसाचारात बळी गेल्याचे स्पष्ट!

निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान मोदींना असल्याचा आरोप हास्यास्पद

जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएकडून आठ ठिकाणी छापेमारी

 

Exit mobile version