राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मविआचा दारूण पराभव केला. महायुतीला २३० तर मविआला ४६ जागांवर यश आले. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नावावर २० जागा आहेत. दरम्यान, या विजयानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपल्या आमदारांना कानमंत्र देत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. यावरून भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना थेट इशाराच दिला. ठाकरेंनी जर फडणवीसांना ललकारण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे केवळ २ आमदार शिल्लक राहतील उर्वरित आमदार आमच्याकडे येतील, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंनी निवडून आलेल्या २० आमदारांची भेट घेत संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आमदारांना म्हटले की, ‘जरी समोर फडणवीस असले तरी तुम्ही २० आहात, त्यांना पुरुन उरा. यावर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना जास्त प्रमाणात आणीबाणी, ललकारण्याचा प्रयत्न केला गेला तर उद्धव ठाकरेंचे फक्त २ शिल्लक राहतील बाकीचे सर्व गायब होतील. त्यांच्याकडे जे आमदार आहेत ते देखील फडणवीसांवर प्रेम करता त्यांना मानतात.
जर ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिलं तर त्यांच्याकडील १८ आमदार पळून जातील. देवेंद्र फडणवीस हे लोकनेते असून सर्व आमदारांचे ते काम करतात, असे बावनकुळे म्हणाले.
हे ही वाचा :
जलेबी-फाफडा विरुद्ध उद्धव ठाकरे बापडा
थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा…
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे साधू चिन्मय प्रभू यांना अटक
तेलंगणाने अदानी समूहाचा निधी नाकारला