गलवानचे हुतात्मा कर्नल संतोष बाबूंना मरणोत्तर महावीर चक्र

गलवानचे हुतात्मा कर्नल संतोष बाबूंना मरणोत्तर महावीर चक्र

गलवानमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या कर्नल संतोष बाबू यांना २६ जानेवारी २०२१ ला प्रजासत्ताक दिनानिमित्त मरणोत्तर महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मे २०२० ला गलवानमध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये हाणामारी झाली, त्यावेळी कर्नल संतोष बाबू यांना वीरमरण आले.

संतोष बाबूंना महावीर चक्र पुरस्कार देण्याबरोबरच संजीव कुमार यांना किर्ती चक्र पुरस्कार तर पाच जवानांना वीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय तीन जवानांना शौर्य चक्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कर्नल संतोष बाबू हे भारतीय सैन्याच्या बिहार इनफंट्री बटालियनचे कंपनी कमांडर होते. चिनी सैनिक पेट्रोलिंग पॉईंट १४ च्या पलीकडे गेलेले असल्याची खात्री करून घेण्याची जवाबदारी त्याच्यावर होती. यासाठीच ते स्वतः पाहणी निमित्त पेट्रोलिंग पॉईंट १४ वर गेले असताना तिथे त्यांना एक चिनी तंबू आढळला. तो तंबू भारतीय हद्दीत असल्याचे कळल्यावर त्यांनी तातडीने तो तंबू उध्वस्त केला. जवळ असलेल्या चिनी सैनिकांनी मोठ्या संख्येने या छोट्या भारतीय तुकडीवर हल्ला केला आणि या हल्ल्यातच संतोष बाबू मृत्यमुखी पडले.

कमांडींग ऑफिसरवर झालेला हल्ला बघून अनेक ठिकाणांवरून भारतीय सैनिक पेट्रोलिंग पॉईंट १४ वर गेले आणि त्यांनी अनेक चिनी सैनिकांना तोडीसतोड प्रत्युत्तर दिले.

या घटनेनंतरच्या पहिल्याच होत असलेल्या प्रजासत्ताकदिनाला या सर्व हुतात्म्यांना सम्मानित करण्यात येणार आहे.

Exit mobile version