महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे आज, २ मे रोजी कोल्हापूर येथे निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी अरुण गांधी यांनी अखेरचा श्वास घेतला. लेखक, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते असणाऱ्या अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासंबंधीची माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली आहे.
अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. अरुण मणिलाल गांधी हे महात्मा गांधींचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. अरुण गांधी हे सामाजिक कार्यात सक्रिय होते. त्यांचे वडील ‘इंडियन ओपिनियन’ या वृत्तपत्राचे संपादक होते, तर त्यांची आई त्याच वृत्तपत्रात प्रकाशक होती. अरुण गांधी यांनी हे सामाजिक- राजकीय मुद्द्यांवर कार्यकर्ते म्हणून काम करत होते.
हे ही वाचा:
भिवंडीतून गायब झालेले बाळ सापडले झारखंडमध्ये
‘वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम’
केरळ स्टोरीवर सरकारकडून बंदीची मागणी वितरक मात्र पाठीशी
काली मातेच्या त्या फोटोवरून युक्रेनने टेकले गुडघे
अरुण गांधी यांनीही काही पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी ‘द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रन्डफादर महात्मा गांधी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. अरूण गांधी हे काही वर्षांपूर्वी अमेरिकेत वास्तव्यास होते. त्यांनी क्रिश्चियन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये अहिंसेशी संबधित एक संस्था स्थापन केली होती. त्यापैकी द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी हे प्रमुख आहेत. अरुण गांधी १९८७ मध्ये कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले. येथे त्याने आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे मेम्फिस, टेनेसी येथे घालवली. येथे त्यांनी ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली.