‘महर्षी स्वामी दयानंद सरस्वती’ यांचं जन्म १२ फेब्रुवारी १८२४ ला गुजरातमधील टंका इथे झाला. त्यांचे वडील कृष्णाजी लालजी तिवारी आणि आई यशोदाबाई ब्राह्मण सुसंप्पन कुटुंबात असा झाला. त्यांचे वडील कर वसुली करणारे होते. स्वामी दयानंद यांचे खरे नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी होते. संन्यास घेतल्यावर त्यांनी दयानंद सरस्वती असे नाव धारण केले. होते. स्वामीजींचे सुरवातीचे जीवन खूप आरामदायी होते. त्यानंतर ते संस्कृत,वेद,शास्त्र, आणि इतर धार्मिक ग्रंथाच्या अभ्यासात स्वतःला गुंतवून घेतले.
सत्यपथ के अविचल पथिक, मूर्धन्य विचारक व महान समाज सुधारक स्वामी दयानन्द सरस्वती जी को कोटि-कोटि नमन। pic.twitter.com/kk0vAFR6jo
— BJP (@BJP4India) February 12, 2023
१८४६ मध्ये सत्याच्या शोधात
स्वामीजींची धाकटी बहीण आणि काका हे कॉलराच्या आजाराने मृत्यू पावले. त्यामुळे स्वामीजी व्यथित होऊन जन्म मृत्यूच्या अर्थाचा खोलवर विचार करण्यासाठी सत्याच्या शोधात बाहेर पडले. गुरु विराजानंद यांनी त्यांना पाणिनी व्याकरण , पंतांजली योगसूत्र आणि वेड वेदांग यांचा अभ्यास करायला लावला. स्वामीजींनी शिक्षण पूर्ण होत असताना गुरूंना गुरुदक्षिणेत काई असे विचारले असता गुरूंनी त्यांना शिक्षण यश्वी करून, खऱ्या धर्मग्रंथांचे जातं करा, मतमतांतराचे अज्ञान मिटवा,वेंदांच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार दूर करा , वैदिक धर्माचा प्रकाश सर्वत्र पसरावा हीच तुमची गुरुदक्षिणा असे सांगितले.
गिरगावात १८७५ साली आर्य समाजाची स्थापना
महर्षी स्वामी दयानंद यांनी १८७५ साली गिरगाव मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. आर्यसमाजाचे नियम आणि तत्वे हि सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी असून वेदांचे अधिकार त्यांनी नेहमीच सर्वोच्च मानला. स्वामीजींनी कर्म सिद्धांत , पुनर्जन्म, ब्रह्मचर्य,आणि त्याग या तत्वज्ञानाचा मुख्य आधार बनवला. निषेधाची पर्वा न करता हिंदू समाजाचे पुनरुत्थान हेच स्वामीजींचे ध्येय होते. कोणाच्याही विरोधाची आणि निषेधाची पर्वा न करता हिंदू समाजाला नवसंजीवनी देणे हे स्वामीजींनी आपले ध्येय बनवले. स्वतःच्या धर्माप्रती स्वामीजींची प्रचंड निष्ठा होती. त्यांनी १८७६ मध्ये त्यांनी पहिला स्वराज्याचा नारा दिला होता. तो लोकमान्य टिळकांनी पुढे नेल्याचे म्हंटले जाते.
सती प्रथा, अस्पृश्यता , बालविवाह, धार्मिक संकुचितता आणि अंधश्रद्धा यांच्या विरोधात त्यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला. आणि विधवा विवाह , धार्मिक औदार्य आणि परस्पर बंधुत्वाला पाठिंबा दिला. आपण त्यांना खरी आदरांजली तेव्हाच साजरी करू शकतो जेव्हा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतो आणि त्यांच्या आदर्शांना आपल्या जीवनशैलीचा भाग बनवतो हे महत्वाचे.
.