31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषमहाराष्ट्राचे 'राजदीप' अर्थात, कोडगे कुबेर

महाराष्ट्राचे ‘राजदीप’ अर्थात, कोडगे कुबेर

Google News Follow

Related

विश्वगुरु घाबरले? या नावाने पुन्हा एकदा फेकसत्ताने आपल्या अकलेचे दिवाळे निघाल्याची पावती दिलीये. कोणत्याही गोष्टीत ‘मोदीविरोध’ हा एकमेव अजेंडा राबवणाऱ्या कुबेरांनी चुकून एकदा मदर तेरेसांच्या संतपदाविषयी खरं लिहिण्यात आपली लेखणी झिजवली होती. परंतु, ख्रिश्चन समुदायाच्या नाराजीला घाबरून लगेचच अग्रलेख मागे घेत माफी मागण्याची ऐतिहासिक घटनाही त्यांनीच घडवली होती. त्यानंतर ‘खरे माफीवीर संपादक’ म्हणून गाजलेल्या कुबेरांनी आपल्या तथाकथित लेखणीद्वारे खोटंनाटं लिहिण्याची परंपरा सुरू केली. कधी सरसंघचालकांच्या तोंडी खोटी वाक्यं घालून तर कधी सरदार पटेलांच्या पुतळ्याविषयी खर्च झालेल्या रकमेचे खोटे आकडे प्रसिद्ध करून माफी मागण्याची वेळ त्यांच्यावर येत राहिली. तरीही सुधारतील तर ते कुबेर कसले?

खोट्याचं खरं की खऱ्याचं खोटं?

आता काय तर, मोदीद्वेषाची कावीळ इतकी फसफसली की विश्वगुरू घाबरले का असा सवाल करत कुबेरांनी पुन्हा एकदा लोणकढी थाप ठोकण्याचा पराक्रम केलाय. देशभरातील विद्यापीठांत आता आंतरराष्ट्रीय परिसंवाद भलेही दूरस्थ असला तरी परराष्ट्र खात्याच्या पूर्वपरवागनीशिवाय करता येणार नाही, असे त्यांनी म्हटलंय. खरंतर याच सर्क्युलरचा हवाला देत इंडियन एक्सप्रेसमध्येही अग्रलेख लिहिला गेला असून त्यात मात्र केवळ सरकारी अनुदानित विद्यापीठांसाठीच हे सर्क्युलर असल्याचे नोंदवले आहे. आता कुबेरांचा फेकसत्ता बरोबर की इंडियन एक्सप्रेस?

कुबेरांच्या खोटेपणाची जाण असलेल्यांनी लगेचच यावर सोशल मीडियावरून त्यांची हजेरी घ्यायला सुरुवात केली असली तरी ‘असंताचे संत’नंतर केवळ हिंदूंवरच टीका करण्याचा विडा उचललेल्या कुबेरांनी यावर गप्प राहणंच पसंत केलंय. खरंतर शेतकरी आंदोलनावरून टीकेची झोड उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुबेरांनी या एका सर्क्युलरवरून मोदी सरकार कसे हिटलरशाही राबवतंय, हे दाखवण्याचा अटोकाट प्रयत्न या अग्रलेखातून केलाय. अर्थात, त्यासाठी जे काही हास्यास्पद दावे केलेत ते म्हणजे वडाचं साल पिंपळाला लावण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. त्यांचा हा खोटेपणा केवळ तथाकथित पुरोगामी बुद्धिवंतांसाठीच असतो, हे आता जगजाहीर आहे.

नक्की त्रास कुणाला?

आता नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेत कोण तो शारजील उस्मानी स्टेजवर आला काय, वाट्टेल ते बरळला आणि हिंदूविरोधी गरळ ओकला. कोणी अडवलं का त्याला? ज्या पुणे पोलिसांनी या परिषदेला आधी परवानगी नाकारली होती, त्या पोलिसांनीही ही सर्व भाषणं रेकॉर्ड केल्यानंतरही कारवाई का केली नव्हती? स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या ठाकरे सरकारनंही याबाबत षंढपणा दाखवला. भविष्यात असल्या गोष्टी होऊ नये, असे वाटत असेल तर आधीच कोण बोलणार आहे, याची माहिती घेतली तर बिघडलं कुठं? पण ज्यांना समाजात तेढ निर्माण करण्यासाठीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा उपटायचा आहे, अशा कुबेरवादी पुरोगाम्यांना या सर्क्युलरमध्ये स्वातंत्र्यावर गदा आल्याचं भासणं स्वाभाविकच आहे!

खरंतर, विद्यापीठांमधल्या नियमांनुसार, एखाद्या कॉन्फरन्ससाठी परकीय विद्वानांना बोलवायचे असेल तर संबंधित व्यक्तीच्या व्हिसा अर्जासोबत पत्रं द्यावेच लागते. संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती भारतीय दूतावास घेतो आणि अँटी नॅशनल कार्यात गुंतलेल्या व्यक्तींना व्हिसा नाकारण्याची उदाहरणे आजवर अनेकदा आपण पाहिली आहेत. कोविडकाळाने आता ऑनलाइन, व्हीसी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) वगैरे प्रकार सुरू झाल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे सर्क्युलर काढण्यात आले असेल तर त्यात चुकीचे काय? परंतु, मोदीद्वेषाची कावीळ झालेल्यांना सर्वच पिवळं दिसतं. त्यामुळे, कुबेरांसारख्यांना यातही स्वातंत्र्याची गळचेपी, हिटलरशाही दिसणं स्वाभाविक आहे.

फेकसत्ताची मत्ता आता किती बिघडली आहे, हेच यातून समोर येतंय. काश्मीर प्रकरणात लष्कर आणि लष्करप्रमुखांवर खास कुबेरी शैलीत वर्दीतील वावदूक अशी सुरुवात करणाऱ्यांना राष्ट्रवाद म्हणजे काय हे सांगण्याचा अधिकार नाही. उलट त्यांना राष्ट्रवादी शिकण्याची गरज आहे. ज्यांचं लिखाण मुळात ‘चोरीचा मामला’ असतो त्यांच्यावर आता हळूहळू नव्हे होळीच्या आवेशात बोंबलण्याची वेळ आलीये.

खोटारडे कुबेर

अँड्र्यू लिलीको या परदेशी व्यक्तीचा ब्लॉग जसाचा तसा भाषांतरित करणाऱ्या कॉपीमास्टर संपादकाने आतातरी दुसऱ्यांना अकलेचे धडे देण्याचे थांबवावे आणि सूर्याकडे बघून थुंकणं बंद करावं.

सरसंघचालक मोहन भागवतांच्या तोंडी न केलेलं विधान घालून २१ सप्टेंबर २०१८ रोजी सूर नवे पद पद्य… असला काहीतरी अग्रलेख लिहिण्यात आला होता. महंमद अखलाकच्या कथित हत्येप्रकरणी सरसंघचालकांवर खोटा आरोप केल्याप्रकरणी सोशल मीडियात लाज निघाल्यानंतर कुबेरांना प्रेस कौन्सिलकडेही माफी मागण्याची वेळ आली. दुसऱ्या दिवशी खुलासा करताना त्यातही पांचजन्यचा उल्लेख करत खोटी माहिती देण्याचा प्रयत्न झाला. त्यातही तोंडावर पडले तरी हे कुबेर सुधारण्याचे नाव घेत नाहीत.

कुबेरांचा राजदीप करा…

फेकसत्ता असं नामकरण झालेल्या या वर्तमानपत्राने माफी तरी किती वेळा मागायची? लोकसत्ताचा खप आणि प्रतिमा बिघडली तरी कुबेरगिरी कमी होताना दिसत नाही. तेव्हा, इंडिया टुडे ग्रुपने जसे खोटं ट्वीट केल्याप्रकरणी राजदीप सरदेसाईना जसं ऑफ एअर केलं तसंच आता एक्स्प्रेस ग्रुपने करण्याची गरज आहे. अन्यथा, अशा कुबेरगिरीमुळे कुबेर शब्दाला भिकेचे डोहाळे लागले तर आश्चर्य वाटणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा