उदयराज हिन्दू इंटर कॉलेज काशीपूर (उत्तराखंड ) येथे या महिन्याच्या दरम्यान ईक्युपड सिनियर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी भारतातील २५ राज्यातील पुरुष व महिला अशा ३१० खेळाडूनी सहभाग नोदवला. पुरुष व महिला दुस-या क्रमांकाचा चॅम्पियन पुरस्कार मिळाला, आंतरराज्य दुस-या क्रमांकाचे सांघिक चॅम्पियन विजेते आणि दुस-या क्रमांकाचे टिम चॅम्पियन चषक महाराष्ट्राच्या संघाने प्राप्त केला.
या स्पर्धेत खास वैशिष्ट असे कि,मतीमंद खेळाडूनी सिनियर स्पर्धेत सहभाग नोंदवून पदके मिळवील हे वेगळे वैशिष्ट या स्पर्धेत पाहण्यात आले. महाराष्ट्र, मणीपूर आणि उत्तराखंड राज्यातील १२ मतीमंद खेळाडूनी सहभाग नोंदवला आहे. राज्यातील मतीमंद खेळाडूंनी स्पर्धेत चांगले यश संपादन केले. पॉवरलिफ्टिंग इंडिया फेडरेश्ने या वेळी प्रथमच अशा राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर संधी उपलब्ध करुन दिली आहे. हे कौतुकास्पद काम आहे.
हे ही वाचा:
आता नेहरू मेमोरियल नाही, प्राईम मिनिस्टर म्युझियम
हिमाचल, उत्तराखंडमध्ये पावसाच्या तडाख्यात ६६ जणांचा मृत्यू !
शिमल्यामध्ये जोशीमठसारखी परिस्थिती; घरांना भेगा
चाचणी न देताच संघात आलेल्या विनेशची आशियाई स्पर्धेतून माघार
या यशात अर्जुन पुरस्कार विजेते संजीवन भास्करण सर, रक्षा महाराव, राज्य संघटनेचे सचिव संजय सरदेसाई, आनंत चाळके, सुरेश गर्दे, आणि इतर संघटनेतील पदाधिकारी यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला.
इक्विप्ड स्पर्धेतील पदक विजेते –
पुरूष गट-
रौप्य पदक विजेते पुरुष- ५९ किलो वजनी गट- धर्मेद्र यादव, ६६ किलो वजनी गट- साहिल उत्तेकर, ८३ किलो वजनी गट- निलेश गराटे
कास्य पदक विजेते पुरुष- ६६ किलो वजनी गट- व्यकंटेश कोणार, ईक्युपड स्पर्धेतील महिला गट-
सुवर्ण पदक विजेत्या महिला- ४७ किलो वजनी गट-कांजल भाकरे, ६९ किलो वजनी गट- अक्षया शेडगे,
रौप्य पदक विजेत्या महिला – ७६ किलो वजनी गट-, जान्हवी सावर्डेकर.
कास्य पदक विजेत्या महिला- ५२ किलो वजनी गट- कामिनी बोस्ते.