कोल्हापूर: लसीचा कोर्स पूर्ण केल्यानंतरही महिलेचा रेबीजने मृत्यू!

शहरातील भाऊसिंगजी रोडवर घडली घटना

कोल्हापूर: लसीचा कोर्स पूर्ण केल्यानंतरही महिलेचा रेबीजने मृत्यू!

कोल्हापुरातील एका २१ वर्षीय तरुणीचा रेबीजच्या आजाराने मृत्यू झाला आहे.धक्कादायक म्हणजे तरुणीने रेबीजविरोधी लसीकरण पूर्ण केल्यानंतर तीन दिवसांनी तिचा रेबीजने मृत्यू झाला.सृष्टी शिंदे असे मृत तरुणीचे नाव आहे.

३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.सृष्टी शिंदे ही शहरातील भाऊसिंगजी रोडवर उभी असताना तेथील भटक्या कुत्र्याने तिचा चावा घेतला.तरुणी शनिवार पेठेत जात असताना तिला एक कॉल आला.कॉलला उत्तर देण्यासाठी ती रस्त्यात थांबली असता एका भटक्या कुत्र्याने तिच्या पायाला चावा घेतला.यानंतर तरुणीने रेबीज प्रतिबंधक लसीचे पाचही डोस घेतले. मात्र, काही दिवसानंतर तिला अचानक ताप येण्यास सुरुवात झाली अन तिचे दोन्ही पाय निकामी झाले.

हे ही वाचा:

मनोहर लाल खट्टर पंजाबचे राज्यपाल होण्याची शक्यता!

मविआला ‘गडकरी प्रेम’ सिद्ध करण्याची संधी

१४ महिन्यांच्या वनवासानंतर रिषभ पंत उतरणार मैदानात

मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा!

तरुणीची तब्बेत अधिकच बिघडत चालल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या.तिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.अखेर चाचणीचा अहवाल आला अन त्यात तरुणीला रेबीजची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.यानंतर पुढील उपचारासाठी तरुणीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला.दरम्यान, लसीचा कोर्स पूर्ण करूनही तिला रेबीज कसा झाला, असा प्रश्न तिच्या कुटुंबियांना पडला आहे.

Exit mobile version