आता गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही होणार ‘सायन्स सिटी’ 

राज्य सरकारकडून समितीची स्थापना

आता गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही होणार ‘सायन्स सिटी’ 

गुजरातच्या पार्श्वभूमीवर राज्यातही आता सायन्स सिटी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने या संदर्भात नुकताच निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य शासनाच्या वतीने आठ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव हे समितीचे प्रमुख असतील. ही समिती गुजरातमधील सायन्स सिटीला भेट देणार असून महिन्याभरात या संदर्भातील अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यात या कामाला सुरुवात होईल.

 

गुजरातमधील या सायन्स सिटीमध्ये विज्ञानासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यात आले आहे. अन्य काही उपकरणेही विकसित करण्यात येत आहेत. पश्चिम परिषदेची १३ वी बैठक नुकतीच गांधीनगर येथे पार पडली. या बैठकीत गुजरात सायन्स सिटीबद्दलचे सादरीकरण करण्यात आले होते. या धर्तीवर महाराष्ट्रात सायन्स सिटी व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

दिल्ली बुडाली; दिल्लीकरांची केजरीवालांवर टीका

गोळवलकर गुरुजींबाबतचे ट्विट दिग्विजय यांना पडणार महागात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला, केली रुग्णाला मदत

सत्तेत असताना जे मंत्रालयात गेले नाही ते आता विदर्भात आलेत!

या समितीचे प्रमुख राज्याचे मुख्य सचिव तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे तसेच नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांचा या समितीमध्ये समावेश आहे.

Exit mobile version