महाराष्ट्र बांगलादेशी आणि रोहिंग्या मुक्त करायचाय!

भाजपा आमदार नितेश राणेंचे वक्तव्य

महाराष्ट्र बांगलादेशी आणि रोहिंग्या मुक्त करायचाय!

भारतासह राज्यातही अनेक बांगलादेशी नागरिक बेकादेशीररित्या प्रवेश करून वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे, येत आहे. महाराष्ट्र पोलीस शोध मोहीम राबवत अशा घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करत आहे. आतापर्यंत कारवाई करत अनेकांना अटक करून त्यांची बांगलादेशला रवानगी करण्यात आली आहे. याच दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र बांगलादेशी आणि रोहिंग्या मुक्त करायचा आहे, असे नितेश राणेंनी म्हटले आहे.

महाराष्ट्र बांगलादेशी आणि रोहिंग्या मुक्त करायचा आहे. ही घाण आम्हाला इथे नको आहे. कारण हे जिकडे जातात तिकडचा भाग ते खराब करतात. बेकादेशीररित्या प्रवेश करून येथे राहणारे हे लोक अतिरेकी कारवायांना मदत करतात, काही भागांमध्ये मतदानातही सहभाग घेतात, असे नितेश राणे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे सरकार या सगळ्या गोष्टीला स्वच्छ करण्याचे काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात एकही बांगलादेशी आणि रोहिंग्या दिसणार नाही.

हे ही वाचा : 

ठाण्यात तीन बांगलादेशी महिलांना अटक!

बांगलादेश न्यायालयाने हिंदू साधू चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला!

सोडणार नाही, फडणवीस गरजले !

सात महीने खदखदणारे मस्साजोग कांड, निर्णायक वळणावर…

Exit mobile version