महाराष्ट्रातील जंगल सफारी पुन्हा सुरु होणार

महाराष्ट्रातील जंगल सफारी पुन्हा सुरु होणार

महाराष्ट्रातील कोरोनाचे प्रमाण हळूहळू कमी होण्याच्या मार्गावर असतानाच राज्यातील निर्बंध शिथील केले जात आहेत. अशातच शाळा, मंदिरे, नाट्यगृहे यांच्या पाठोपाठ अभयारण्यही पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या १ तारखेपासून राज्यातील जंगल सफारी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकिंगला सुरुवात देखील झाली आहे.

दरवर्षी पावसाळ्यातील काही काळ अभयारण्यातील पर्यटन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असते. पण गेली दोन वर्ष कोवीडच्या प्रादुर्भावामुळे अभयारण्यातील पर्यटनावर निर्बंध लादले गेले होते. पण आता अभयारण्यातील पर्यटन निसर्गप्रेमींसाठी पुन्हा एकदा खुले होणार आहे. त्यामुळे राज्यातील ताडोबा, पेंच, बोर, उमरेड-पवनी अशा विविध अभयारण्यातील जंगल सफारी पुन्हा एकदा सुरू होणार आहेत.

हे ही वाचा:

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

देऊळ बंद…कुंकू रुसलं!

पालिकेला दिसले मुंबईत फक्त ९२७ खड्डे

अबब! अडीच लाख वर्षांपूर्वीही पुण्यात माणसाचे होते अस्तित्व

या आधी जून महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. पण त्यावेळी देखील केवळ पाच दिवसांसाठीच हा व्याघ्र प्रकल्प खुला केला गेला होता. तर त्यासोबतच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प देखील २६ ते ३० जून या कालावधीत पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. त्यावेळी केवळ पाच दिवसात या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून ७५ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला होता.

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये पुन्हा एकदा निर्बंध कडक करून जंगल सफारी बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ऑक्टोबर महिन्यापासून ही सफारी सुरू होत आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील निसर्गप्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरलेली दिसत आहे.

Exit mobile version