महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन?

महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन?

महाराष्ट्रात कोविड-१९च्या केसेस पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. राज्यात रविवारी आणि सोमवारी कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली.रविवारी जवळपास साडे तीन हजार आणि सोमवारी ३ हजार ३६५ नवे रुग्ण आढळले. गेल्या दोन आठवड्यांत जवळपास २१ हजार जणांना कोविड-१९चा संसर्ग झाला आहे. यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविड-१९चा प्रकोप व्हायला सुरुवात झाल्याचा, याचा अंदाज येतो. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे. जर कोविड-१९चा प्रकोप असाच कायम राहिला तर पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल का? लॉकडाऊन केला तर कोणत्या भागांत केला जाईल? त्याची रुपरेशा काय असेल? असे प्रश्न जनतेच्या मनात आहेत.

संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागेल, याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु सिमीत लॉकडाऊन केला जाऊ शकतो. ठराविक भागांमध्ये लॉकडाऊन करायचा झाल्यास ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा शहरांमध्ये कोरोनाच्या अधिक केसेस आहेत तिथे लॉकडाऊन होऊ शकतो. जसे की पुणे, नाशिक, अमरावती, वर्धा, मुंबई….

संपूर्ण जिल्ह्यात किंवा शहरात लॉकडाऊन लावण्याऐवजी फक्त जिथे कोविड-१९च्या केसेस वाढत आहेत त्या त्या भागात किंवा वॉर्डात लॉकडाऊन केला जाऊ शकतो.

मध्य मुंबईच्या कुर्ल्यातलं नेहरु नगर, तिलक नगर, विक्रोळी, घाटकोपरला डेंजर झोन म्हणून मोजले जाऊ लागले आहे. या विभागांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येऊ शकते. तसेच मुंबई पश्चिम उपनगरांमध्ये  ब्रांदा, खार, अंधेरी, जोगेश्वरी (पूर्व) या भागांत कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या क्षेत्रांना देखील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येऊ शकते.

Exit mobile version