महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.यावेळी अर्थमंत्री आजी पवार यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केला.श्रीनगर आणि अयोध्या या ठिकाणी महाराष्ट्र भवन बांधणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यातील पर्यटकांना व भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सेवा मिळाव्या यासाठी श्रीनगर (जम्मू-काश्मीर) आणि श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी ‘अयोध्या’ आणि ‘श्रीनगर’ या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून घेतल्या आहेत. या जागांसाठी ७७ कोटींची तरतूद प्रस्तावित असल्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. राज्यातील ११ गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली.तसेच जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या.
हे ही वाचा:
जरांगेंचा बोलविता धनी कोण? लवकरच षडयंत्र बाहेर काढणार
“जरांगेंची भाषा ही कार्यकर्त्याची नसून राजकीय पक्षाची भाषा”
शरीर कमावण्यासाठी तरुणाने चक्क गिळली नाणी, लोहचुंबक!
उत्तर प्रदेशमध्ये सपाचे चीफ व्हीप मनोज पांडे यांचा राजीनामा
अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा :
– सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार
– प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत ३०० युनिटपर्यंत वीज मोफत
– नगरविकासासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद. सार्वजनिक बांधकामास १९ हजार कोटी राखीव ठेवण्यात आले.
– वीज उपलब्ध नसलेल्या ३७ हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येणार आहे.
– राज्यात १८ वस्त्रोद्योग उभारले जाणार
– महिलांसाठी ५,००० हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार
– हर घर हर नल योजनेअंतर्गत १ कोटी नळ जोडणीचे उद्दिष्ट
– मिहान प्रकल्पासाठी १० कोटींचा निधी दिला.
– नवी मुंबई विमानतळ वर्षभरात उभे राहणार
– लघु उद्योग संकुलामधून रोजगार निर्मिती होणार
– संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आहे.
– निर्यात वाढवण्यासाठी ५ इंडस्ट्रियल पार्कची निर्मिती करण्यात येत आहे.