भुवनेश्वर येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद ४०व्या कुमार मुली खो खो स्पर्धेत शनिवारी महाराष्ट्रच्या मुले व मुलींनी व कोल्हापूरच्या व मुलींनी उपांत्य फेरी गाठली.
शनिवारी सकाळी महाराष्ट्राच्या मुलींनी तमिळनाडूचा १०-८ असा डावानी पराभव केला. सरिता दिव्या (३.२० मिनिटे संरक्षण), अश्विनी शिंदे (२.२० मिनिटे संरक्षण) व जान्हवी पेठे (२.०० मिनिटे संरक्षण) व अंकिता लोहार (१.२० नाबाद व २.१० मिनिटे मिनिटे संरक्षण करत) शानदार खेळी केली. तमिळनाडूकडून के. श्रीनिथी हीने (१.४०मिनिटे संरक्षण व २ गुण) एकाकी लढत दिली.
मुलांनी छत्तीसगडवर १०-८ अशी डावानी मात केली. यात किरण वासावेने ४.४० व १.४० मिनिटे संरक्षण अशी खेळी केली. सौरभ अहिर व सूरज जोहरे यांनी २.३० मिनिटे संरक्षण करीत त्याला साथ दिली. सूरजने २ गडीही बाद केले.
कोल्हापूरला राष्ट्रीय स्पर्धेत थेट प्रवेश असतो. त्यांच्या मुलींनी पंजाबचा ८-७ असा ५.४० मिनिटे राखून विजय मिळविला. सृष्टी शिंदे (३.४०व २.१० मिनिटे संरक्षण) व सौंदर्या सुतार (४ गुण) यांनी संघाच्या विजयात उल्लेखनीय कामगिरी केली.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी दिला पाकिस्तानला इशारा
आता चेंबूरलाही झाला बलात्कार; शस्त्राचा धाक दाखवून केला अत्याचार
भारताची प्रगती होते तेव्हाच जगाच्या विकासाला गती मिळते
ठाकरे सरकारला ‘घोळ’ सरकार म्हणायचे का?
कोल्हापूरच्या मुलांना मात्र पश्चिम बंगालकडून कडव्या लढतीनंतर लघुत्तम आक्रमणाच्या डावात ४५ सेकंदाने हार पत्करावी. निर्धारित वेळेतील डावात १२-१२ अश्या बरोबरीनंतर हा सामना जादा वेळेच्या डावातही १८-१८ असा बरोबरीत झाला होता. यात कोल्हापूरकडून सुशांत हजारे (२.३०, २.०० मिनिटे संरक्षण व ३ गुण) व कैवल्य (३.३० व १.१० मिनिटे संरक्षण) तर बंगालकडून बर्मन (१.३०, १.३० मिनिटे संरक्षण व ५ गुण) चमकले.
अन्य निकाल :
मुली : ओरिसा विजयी .वि. पश्चिम बंगाल १३-५ एक डावाने, कर्नाटक विजयी वि. राजस्थान १०-८.
मुले : ओरिसा विजयी वि. तेलंगणा १९-८. दिल्ली विजयी वि. आंध्र १०-९.
असे होणार उपांत्य सामने :
मुली : महाराष्ट्र-ओरिसा, कोल्हापूर-कर्नाटक.
मुले :महाराष्ट्र-ओरिसा, पश्चिम बंगाल-दिल्ली