राजम, एमआरजी टेक्नोलॉजी, विशाखापट्टणम येथे नुकत्याच झालेल्या ईक्युपड व क्लासिक राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चाळीस नवीन विक्रम प्रस्तावीत झाले. सतीश पाताडे यांनी बेंचप्रेस मध्ये राष्ट्रीय विक्रम करुन सुवर्ण पदक जिंकले आणि देवदत्त भोईर यांनी राष्ट्रीय डेडलिफ्टमध्ये विक्रम प्रस्थापित करुन सुवर्ण पदक जिंकले.
सतीश पाताडे, डॉ.शर्वरी इनामदार, रुबी दास, निता मेहता, विनुता रघुनाथ, रणजिता मिश्रा, देवदत्त भोईर, कांतीलाल टकले, आणि अंकुश गाढवे, यांना स्ट्राँग मॅन व वुमन ऑफ इंडिया या किताबाने गौरविण्यात आले. सांघिक विजेते चषक महाराष्ट्राच्या संघाने प्राप्त केला.
या स्पर्धेत खास वैशिष्ट असे आई आणि मुलगी एकाचवेळी स्पर्धेत खेळल्या. आई डॉ. पूर्णा भारदे यांना सुवर्ण पदक आणि मुलगी डॉक्टर शर्वरी इनामदार यांनी सुवर्ण पदकासह स्ट्रॉग वुमन किताब पटकाविला. या यशाबद्दल राज्य संघटनेचे सचिव संजय सरदेसाई, अनंत चाळके, सुरेश गर्दे आणि संघटनेतील इतर पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान, मुख्यमंत्री, निवडणूक आयोगावर टोमणा अस्त्राचा वापर
अबब!! ऍप्पलचे बूट तेही ४० लाखांचे!
कारगिल विजय दिवस; दिवस अभिमानाचा आणि गौरवाचा!
पदक विजेते खेळाडू पुढील प्रमाणे ईक्युपड स्पर्धा पुरूष गट सुवर्ण पदक विजेते खेळाडू – महेश पाटील, सतीश पाताडे, राजेश शेटटे, कुंदन माने, उदय स्वामी, अशोक मते. रौप्य पदक विजेते – कांतीलाल टकले, कांस्य पदक विजेते – जितेंद्र यादव, प्रशांत जगताप, संजय शर्मा, राजहंस मेहंदळे, सलीम शेख
महिला गट
ईक्युपड गटातील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडू – शीतल ताम्हाणे, डॉ.शर्वरी इनामदार, किरण त्यागी, वैशाली तांडेल, स्नेहा कर्नाले, गीताजली दस्तुर, रुबी दास, डॉ.पूर्णा भद्रे. रौप्य पदक – अर्चना काळे, राजश्री पेडणेकर, कास्य पदक – सलमा शेख,
क्लासिक स्पर्धेतील पुरुष-
सुवर्ण पदक विजेते पुरुष खेळाडू – महेश पाटील, राजेश शेटये, मनिश कोंड्रा , सनिल अडसूळ,सुरेश बनसोडे, देवदत्त भोईर, रौप्य पदक विजेते पुरुष – संतोष गावडे, अंकुश गाढवे, प्रशांत जगताप, कास्य पदक विजेते – प्रतिप जागडे, विनोद सातव, कांतीलाल टकले, अनिल कुमठेकर,
क्लासिक स्पर्धेतील महिला
सुवर्ण पदक विजेत्या – नीता मेहता, डॉक्टर शर्वरी ईनामदार, रोहिणी सन्सल, मायानी कांबळे, स्नेहा कर्नाले, विनुता रघुनाथ, गीतांजली दस्तूर, रुबी दास, रंजिता मिश्रा, आणि डॉक्टर पूर्णा भारदे. रौप्य पदक विजेत्या – वैशाली तांडेल, कास्य पदक विजेत्या – मंजुश्री पुराणिक, भारती महापात्रा, मधुरा अंगत.