डॉक्टरांच्या ‘मार्ड’ने विचारला सवाल… कुठे आहे शैक्षणिक फी माफीचे आश्वासन?

डॉक्टरांच्या ‘मार्ड’ने विचारला सवाल… कुठे आहे शैक्षणिक फी माफीचे आश्वासन?

कोरोना काळातील निवासी डॉक्टरांची रुग्णसेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी शैक्षणिक फी माफीचे आश्वासन दिले होते. मात्र, या निर्णयाचा राज्य सरकारला विसर पडल्याचे लक्षात येताच निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने (MARD) राज्य सरकारला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही मागणी मान्य न झाल्याने संप करावा लागेल, अशी माहिती मार्डकडून देण्यात आली आहे. त्यानुसार पुढच्या आठवड्यात संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी झालेल्या सेंट्रल मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत मार्डच्या निवासी डॉक्टर संपाच्या तयारीबाबत निर्णय घेण्यात आला आणि राज्यसरकारला याबाबत स्मरणपत्र देण्याचे ठरले. कोविड काळातील निवासी डॉक्टर यांनी रुग्ण सेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी शैक्षणिक शुल्क माफीचे आश्वासन दिले होते. मात्र, कोविडची लाट ओसरताच या आश्वासनाचा राज्य सरकारला विसर पडला आहे. हे शुल्क माफ करावे, अन्यथा संप पुकारला जाईल, असा इशारा मार्डने दिला आहे. राज्यातील पाच हजारांहून अधिक निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.

हे ही वाचा:

पंजाब राजस्थानच्या सामन्यात बॉलर्सचा बोलबाला

कोण होणार नवे हवाई दल प्रमुख?

‘उठा उठा दिवाळी आली…’ जाहिरातीतील ‘अलार्म काकां’ची एक्झिट!

नसीब फळफळले! तालिबानींमध्ये सापडला समज असलेला एकमेव माणूस

कोरोना काळातील निवासी डॉक्टरांची रुग्णसेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी डॉक्टरांसोबत झालेल्या बैठकीत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण, अजूनही फी माफीचा निर्णय झाला नसल्याने पाच हजारहून अधिक निवासी डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहेत, असे सेन्ट्रल ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version