महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने कोरोना मृतांचा आकडा लपवला नाही, असे छातीठोकपणे म्हटले असले तरी आताच्या आकडेवारीनुसार रविवारी नव्या आकड्यांची (जुन्या मृत्यूंची) भर पडली. एकूण २२८८ नवे आकडे मृतांच्या संख्येत जोडले गेले असून १७ मे ते १३ जून या कालावधीत १७७२४ आकड्यांची भर घातली गेली. गेले चार दिवस २२८८, १६०६, २२१३, १५२२ अशी संख्या आकडेवारीत मिळविली गेली.
राज्य सरकाराने कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्यातील अनेक मृत्यू लपवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे सत्य समोर आल्यानंतर गेल्या चार दिवसांमध्ये आता जुन्या मृत्यूंची नोंद होऊ लागलेली आहे. त्यामुळे मृतांच्या आकड्यांमध्ये अचानक वाढ झालेली आहे.महाराष्ट्रातील मृत्यूंचा ताळमेळ अजून लावणे हे सुरूच आहे.
हे ही वाचा:
शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचं पाप करू नका
मूकबधिर चोराला बोलतं करण्यासाठी वापरली ही शक्कल
जेव्हा देशाचे पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्ष मदत केली होती…
ओबीसींबाबत दिशाभूल! पाहा, काय म्हणते सर्वोच्च न्यायालय?
१७ मे पासून १३ जूनपर्यंत राज्यात गेल्या चार दिवसांमध्ये अनुक्रमे मृतांचा आकडा वाढत आहे. आधी लपवलेले मृतांचे आकडे हे आत्ता जाहीर केल्यामुळे गेल्या चार दिवसांमधील मृतांचा आकडा फुगलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आता नवीन हातात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील मृतांची संख्या १ लाख ११ हजार १०४ इतकी झालेली आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा अधिकार्यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राशी बोलताना म्हटले की, त्यांना आता मृतांच्या आकडेवारीवर पुन्हा फेरबदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मुंबईने आतापर्यंत आकडेवारीत कोणतीही तफावत नाही असेच म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागामध्ये अजूनही कोरोना रुग्ण वाढताहेत. त्यामुळे या भागांमध्ये अजूनही चिंतेचे कारण आहे. सातारा येथे रविवारी ६५ मृत्यू झाले आहे. राज्यातील कोल्हापूरमध्ये काल ५३ मृत्यू झाले असून १ हजार १३२ नवीन रुग्ण सापडले आहेत. कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे ज्याचा कालचा नवीन रुग्णांचा चार अंकी आकडा आहे.