शनिवारी महाराष्ट्रात ५३,६०५ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले असून ८२,२६६ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. या नव्या आकड्यानंतर सध्याची महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही ६,२८,२१३ इतकी आहे. तर राज्यात आजवर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ४३,४७,५९२ इतकी आहे. राज्याचा सध्याची रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ८६.०३ इतकी आहे.
देशात सध्या कोविडचे प्रमाण वाढले असुन त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधीत रूग्ण हे महाराष्ट्रात आढळून येत आहेत. पण सध्या राज्यातील शहरी भागातून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कामी झाले असून ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढत आहे. ही परिस्थितीत नियंत्रणात आणून संक्रमण कमी करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे आता राज्यातील ग्रामीण भागात कडक निर्बंध लावायला सुरुवात झाली आहे.
हे ही वाचा:
पीएम केअर्समधून मिळालेले ६० व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून
कोविड पाठोपाठ बळावतोय आणखी एका आजाराचा धोका
धक्कादायक……!! कालव्यात सापडली शेकडो रेमडेसिवीर इंजेक्शने!!
अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये कडक निर्बंध
विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हा कडक निर्बंधांचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार ९ मे रोजी दुपार पासून हे निर्बंध सुरू होतील आणि १५ मे पर्यंत जिल्ह्यांत हे निर्बंध लागू असतील.