महाराष्ट्रात कोरोना विषाणू थैमान घालत आहे. दिवसागणिक महाराष्ट्रातील कोविड रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. बुधवारी १७ तारखेला राज्यातील कोविड रुग्णांचा आकडा हा चोवीस तासांत तेवीस हजारच्या पार गेला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत रुग्णांचा आकडा हा २३१७९ ने वाढला आहे, तर ८४ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. महाराष्ट्रात दर दिवशी कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. बुधवारी राज्यात २३१७९ नवे रुग्ण आढळून आले. २०२१ या वर्षात २४ तासांत वाढलेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्णवाढ ही नागपूर शहरात झालेली आहे. नागपूर मध्ये गेल्या चोवीस तासांत ३३७० रुग्ण वाढले आहेत.
हे ही वाचा:
वाझेंना ऑपरेट करणारे सरकारमध्ये बसले आहेत – देवेंद्र फडणवीस
कोण आहेत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे?
अखेर परमबीर सिंह यांची हकालपट्टी
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता
देशभरात वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येमुळे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी आभासी बैठकीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णांविषयी चिंता देखील व्यक्त केली.
यावेळी ते म्हणाले की बऱ्याच कोविड बाधित देशांत नंतर कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात अधिक मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण वाढत आहेत. त्याबरोबरच त्यांनी हे देखील सांगितले की आपण कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी आपण वेगाने काम करणे आवश्यक आहे.
एकीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ठाकरे सरकार लसीकरण मोहीम नीट राबवत नसल्याची टीका केली जात आहे. केंद्राने पाठवलेल्या लसींपैकी ठाकरे सरकारने ५६ टक्के लसी वापरलेल्या नाहीत असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सर्जकारवार निशाणा साधला आहे. केंद्राने लस कमी दिली असे सांगत ठाकरे सरकार राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.
प्राप्त झालेल्या एकूण कोविड लसींपैकी 56 टक्के लस महाराष्ट्राने वापरलेल्या नाहीत. आम्हाला लस कमी दिल्या जातात, असे सांगून महाविकास आघाडी सरकार राजकारण करीत आहे : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) March 17, 2021