बुधवारी महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर बघायला मिळाला. बुधवारी राज्यात ३९५४४ नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर २२७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावल्याची नोंद करण्यात आली आहे. वर्षभारतली ही एका दिवसात नोंदवलेली सर्वाधिक मृत्यूंची संख्या आहे. बुधवारी भारताने नोंदवलेल्या रुग्णवाढ आणि मृत्यूंपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. बुधवारी भारतात ५३४८० कोरोना रुग्ण सापडले तर ३५४ जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाले आहेत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईने पुन्हा एकदा चोवीस तासात पाच हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण नोंदवले आहेत. बुधवारी मुंबईत ५,३९४ नवे रुग्ण सापडले आहेत. पण त्याचवेळी चोवीस तासांत ३,१३० जण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान मुंबईसह महाराष्ट्राची कोरोना परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. पण त्याप्रमाणत महाराष्ट्रात आरोग्य सुविधांची फारच कमतरता भासत आहे.
हे ही वाचा:
इशरतच्या पाठिराख्यांचा पर्दाफाश
लुंडमध्ये कोविड रुग्णालयांची संख्या वाढवा – प्रकाश गंगाधरे
अनिल देशमुख यांच्या विरोधातील चौकशी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक
फडणवीसांनी केली आव्हाडांची बोलती बंद
मंगळवारी मुंबई महापालिकेने एक आदेश काढत मुंबईतील खासगी रुग्नालयांच्या ८०% खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोरोना रुग्णांना या खाटा महापालिकेच्या नियोजनातुन देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण मुंबईतील वाढती कोरोना रुग्णांची आकडेवारी बघता त्याला पुरेसे बेड्स मुंबईमध्ये उपलब्ध नाहीयेत. तर बुधवारी पुण्यात व्हेन्टिलेटरची सुविधा असणारे फक्त आठ आयसीयू बेड्स शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे.