27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषमहाराष्ट्राला 'राष्ट्रीय खनिज विकास' पुरस्कार

महाराष्ट्राला ‘राष्ट्रीय खनिज विकास’ पुरस्कार

Google News Follow

Related

राज्याला दोन कोटींची प्रोत्साहनपर रक्कम

खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्राला केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय खनिज पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्राला २ कोटी ७ लाख ३४ हजार ३७५ रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम प्रदान करण्यात आली आहे.

केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाच्यावतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित सहाव्या खाण व खनिज संमेलनात हे पुरस्कार व प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात आली. यावेळी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विभागाचे सचिव आलोक टंडन उपस्थित होते.

या समारंभात वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ करिता एकूण तीन श्रेणींमध्ये प्रत्येकी ३ राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार प्रदान करण्यात आले. खनिज श्रेणीत महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. १ कोटी रुपये रोख, चषक आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वर्ष २०२०-२०२१ दरम्यान खनिज ब्लॉकच्या यशस्वी लिलावासाठी देशातील १० राज्यांना या समारंभात मंत्री श्री. शाह यांच्या हस्ते आज प्रोत्साहनपर रक्कम प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रालाही या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी २ कोटी ७ लाख ३४ हजार आणि ३७५ रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम प्रदान करण्यात आली. राज्याच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांनी ही रक्कम स्वीकारली आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने प्राथमिक खनिज शोध लावलेल्या महाराष्ट्रातील ५ ब्लॉकचेही यावेळी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यमंत्री श्री. दानवे यांच्या हस्ते राज्याला हस्तांतरण करण्यात आले. भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हे एकूण ५ ब्लॉक हस्तांतरित करण्यात आले. या हस्तांरणानंतर राज्य शासनाला संबंधित ब्लॉकचा लिलाव करून अधिक खनिज सर्वेक्षण करता येऊ शकेल.

हे ही वाचा:

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान साहित्य मुंबईत दाखल

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात

या समारंभात केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री श्री. जोशी आणि राज्यमंत्री श्री. दानवे यांच्या हस्ते देशातील ४० खाणिंना उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील ६ खाणिंचा यात समावेश आहे. यात भंडारा जिल्ह्यातील चिकला मँगनीज खाण, गोंदिया जिल्ह्यातील धोबीतोला लोखंड खनिज खाण, नागपूर जिल्ह्यातील गुमगांव आणि कांद्री मँगनीज या दोन खाणी, चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड आणि नावकरी या दोन चुनखडी खाणिंना गौरविण्यात आले. या खाणिंच्या व्यवस्थापनविषयक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा