महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट

अंटार्टिकामध्ये सुद्धा कोरोनाची लागण. चिलेच्या संशोधन केंद्रातील ३६ शास्त्रज्ञांना बाधा.

महाराष्ट्रात शनिवारी कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट झाला आहे. शनिवारी महाराष्ट्रात चोवीस तासात झालेली रुग्णवाढ ही आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर राजधानी मुंबईनेही कोविड रुग्णवाढीच्या बाबतीत उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्रात झालेली रुग्णवाढ ही ५० हजारच्या उंबरठ्यावर आहे तर मुंबईत ९ हजारचा आकडा पार केला आहे. शनिवारी ५,३२२ इतके कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शनिवारी राज्यात ४९,४४७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर ३७,८२१ रुग्ण हे बरे झाले आहेत आणि २७७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. दुसरीकडे राजधानी मुंबईत शनिवारी ९,०९० इतके कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या रुग्णवाढीनंतर मुंबईतील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा हा ६२,१८७ इतका झाला आहे.

हे ही वाचा:

…आणि महाराष्ट्र काँग्रेस पडली तोंडावर

आव्हाड साहेब…उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा

मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल-अस्लम शेख

इतका कन्फ्यूज मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिला नाही, मनसेचे सडेतोड

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. देशातली सर्वाधिक कोरोना रूग्णसंख्या ही महाराष्ट्रात आहे.देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असणाऱ्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात लाॅकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी नियोजन करण्याच्या सुचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला लाॅकडाऊनचा इशारा दिला. नागरिकांनी नियम पाळले नाहीत आणि रुग्णसंख्या वाढत राहिली तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल आणि दोन दिवसांत त्यासंदर्भातील निर्णयात घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. शनिवारी महाराष्ट्रात झालेली रुग्णवाढ बघता महाराष्ट्राचा प्रवास लॉकडाऊनच्या दिशेने होत आहे असेच म्हणावे लागेल.

Exit mobile version