वाघांची संख्या भारतामध्ये कमी होताना दिसत आहे. वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण हे वाढत असल्याची चिंताजनक बाब आता समोर आली आहे. ‘क्ला’- कन्झर्वेशन लेन्सेस अँड वाईल्डलाइफ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव क्षेत्रात काम करत आहे. मुख्यतः ही संस्था वाघांचा मृत्यू यावर आधारीत काम करत असते. नुकताच या संस्थेकडून वाघांच्या मृत्यूविषयी झालेल्या नोंदीमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा असल्याचे समोर आले आहे.
२०१९ या संपूर्ण वर्षांत वाघांच्या मृत्यूची ८४ प्रकरणे नोंदवण्यात आलेली आहेत. यावरूनच सलग तीन वर्षांच्या आकडेवारीवरून वाघांचा मृत्युदर वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे. व्याघ्र संरक्षणासाठी आता तरी ठाकरे सरकारकडून महत्त्वाची पावले उचलली जायला हवीत.
भारतामधील वाघांचा मृत्यूदर हा चिंतेचाच विषय आहे. आपल्याकडे सलग दोन वर्षांपासून वाघांच्या मृत्यूची वाढती आकडेवारी वाढतच आहे. गेल्या सहा महिन्यामध्ये तब्बल ८६ वाघांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. देशामध्ये व्याघ्रगणनेत वाघांची संख्या वाढली ही समाधानाची बाब आहे. परंतु वाघांच्या मृत्यूंचेही प्रमाण वाढत असल्यामुळे आता वन खात्यासमोर मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. देशामध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात १५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हे ही वाचा:
वाझेचा ‘नंबर वन’ अनिल देशमुखच!
कॅलिफोर्नियामध्ये तापमानाचा उच्चांक
शाळा सुरू करण्याबाबत ठाकरे सरकारची ढकलगाडी सुरूच
गेली दीड वर्षांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळेच ज्या भागात कोरोनामुळे मृत्यू सर्वाधिक झाले त्याच भागात वाघांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढलेले आहे. परंतु या दोन्ही गोष्टींचा मात्र एकमेकांशी काहीही संबंध नाही हेही उघड झाले आहे. वाघांच्या मृत्यूमध्ये सर्वात पहिला क्रमांक हा मध्यप्रदेश या राज्याचा लागतो. तर दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. देशातील राज्यनिहाय वाघांचे मृत्यू हा चिंताजनक विषय आहे. आत्तापर्यंत २२ मृत्यू हे महाराष्ट्रात यावर्षी झालेले आहेत.