पुढील काही तासात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पाऊसाची हजेरी लागण्याची शक्यता

पुढील काही तासात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पाऊसाची हजेरी लागण्याची शक्यता

महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. राज्याच्या विविध भागात या अवकाळी पाऊसाचा तडाखा पाहायला मिळाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या परिसरात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे हा पाऊस अनुभवायला मिळत आहे. दरम्यान या पावसामुळे मुंबईत यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

डिसेंबरचा महिना येताना आपल्यासोबत पाऊस घेऊन आला आहे. बुधवार, १ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. सकाळपासून सुरु झालेल्या पाऊसाच्या सरी थांबायचे नाव घेत नाहीयेत. पावसाची ही संततधार कोणतीही विश्रांती न घेता सुरु आहे. बंगालच्या उपसागरात येऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे हा पाऊस पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

किशोर गट राष्ट्रीय खोखोत महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद

ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!

शाळाबंदी करून शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा ठाकरे सरकारचा डाव

‘नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू’

या चक्रीवादळाचे नावे ‘जवाद’ असे आहे. सौदी अरब या देशाने हे नाव ठेवले आहे. हे चक्रीवादळ सौदी अरेबिया येथून भारतात दाखल होण्याशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओरिसा आणि आंध्र प्रदेश येथील किनारपट्टीला हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वादळाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१ डिसेंबरला सकाळी अचानक सुरु झालेला पाऊस, गुरुवार २ डिसेंबर रोजीही थांबलेला नाही. ४ डिसेंबर पर्यंत हा पाऊस असाच सुरु राहू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील काही तासात मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, नाशिक अशा विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version