गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा १४,३१७ नी वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील याविषयीचे सुतोवाच केले आहे.
महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यानंतर सर्वात जास्त केसेस या गुरवारी नोंदवल्या गेल्या आहेत. गुरुवारी राज्यात १४३१७ रुग्ण वाढले आहेत. गुरुवारी राज्यातील ७१९३ रुग्ण बरे झाले आहेत तर ५७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोविड-१९ च्या केसेस पुन्हा एकदा वाढत आहेत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये केसेस वाढत असल्यामुळे नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जालना, यवतमाळ आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणी नाईट कर्फ्यू जाहीर केला गेला आहे. याशिवाय नागपूरमध्ये गुरुवारीच पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यातच गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलताना राज्याच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊन लावायला लागेल आणि लवकरच या संबंधीचा निर्णय घेऊ असे सांगितले आहे.
हे ही वाचा:
भारताच्या कोविड-१९ केसेसपैकी पन्नास टक्क्याहून जास्त केसेस ‘या’ राज्यातून
महाराष्ट्राची उपराजधानी टाळेबंदीत
आफ्रिकेतून परत पाठवलेली लस?- अतुल भातखळकर
केंद्र सरकारकडूनही महाराष्ट्राच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य आणि केंद्रीय कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्हि. के. पॉल यांनी महाराष्ट्रातील कोविड गंभीर मामला असून सरकारला त्याविषयी चिंता असल्याचे वक्तव्य केले आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना भारतातील कोविड-१९ ची परिस्थिती गंभीर आहे आणि महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती हलक्यात घेता येणार नाही असे पॉल यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या देशातील सर्वात जास्त म्हणजे १ लाखापेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे.