राज्यामध्ये लस तुटवडा असे महाविकास आघाडीचे मंत्री टुमणे वाजवत असले तरी, सध्याच्या घडीला राज्याने विक्रमी कामगिरी केलेली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच राज्यानं लसीकरणात वेगळा विक्रम केला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये राज्यानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दिवसभरात १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले. आरोग्य विभागानं यासंदर्भातली आकडेवारी दिली आहे.
याआधी ३ जुलैला ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्यानं विक्रमी नोंद केली होती. त्यानंतर १४ ऑगस्ट दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देत राज्यानं यापूर्वी विक्रम मोडला होता. केंद्रांच्या माध्यमातून १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्यातील आतापर्यंत दिलेल्या डोसची संख्या ५ कोटींवर गेली आहे. लसीकरणात संपूर्ण देशभरात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र राज्यानं ही विक्रमी कामगिरी केली आहे.
आता राज्याने १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम केला आहे. एकाच दिवसात जवळपास ११ लाखांच्या आसपास नागरिकांना लसीकरण झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेनं केलेल्या कामाचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे. मात्र केंद्राकडून लसी पुरविल्या जात नसल्याबद्दल सातत्याने राज्याकडूनच ओरड होत असते. आता केंद्राकडून मिळालेल्या लशींच्या आधारेच महाराष्ट्राने हा विक्रम केला आहे. त्याबद्दल मात्र राज्य सरकारकडून शब्दही उच्चारला जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
हे ही वाचा:
त्या मुलीने अचूक ओळखले ‘छोटे सर’ला आणि पाठवले तुरुंगात
विम्याच्या बहाण्याने त्यांनी घातला इतक्या लाखांचा गंडा
मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर फिरला बुलडोझर, सोमैय्या म्हणतात ‘पुढचा नंबर…’
यंदा गणेशोत्सव मंडळांचा उत्साह फिका
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केलं आहे. याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता राज्याची आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीनं अधिक प्रयत्न करण्यात येतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मत व्यक्त केले.