बारावीचा निकाल ९९.६३ टक्के, पुन्हा एकदा मुलीच ठरल्या सरस

बारावीचा निकाल ९९.६३ टक्के, पुन्हा एकदा मुलीच ठरल्या सरस

राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलेला महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी बारावीचा निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. तर यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे दिसत आहे. चार वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर झाला असून बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर झाल्याची घोषणा केली आहे.

दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या वेटेजवर तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर बारावीचे गुण ठरवण्याचा फॉर्म्युला सरकारने काढला होता. त्याच निकषानुसार आता बारावीचा निकाल लावण्यात आला आहे. बारावीचा एकूण निकाल ९९.६३ टक्के निकाल लागला असून यात विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के वाणिज्य शाखेचा निकाल९९.९१ टक्के तर कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के इतका लागला आहे.

यावेळी बारावीच्या परीक्षेत मुलींचा निकाल ९९.८१ टक्के इतका लागला असून मुलांचा निकाल ९९.५४ टक्के इतका लागला आहे. विभागवार निकाल पाहिला तरीही प्रत्येक विभागात ९९ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक निकाल लागल्याचे दिसत आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा असून त्याखालोखाल मुंबई आणि पुणे विभाग आहेत. तर सर्वात शेवटी औरंगाबाद विभागाचा निकाल आहे.

कोकण: ९९.८१
मुंबई : ९९.७९
पुणे : ९९.७५
कोल्हापूर : ९९.६७
लातूर : ९९.६५
नागपूर : ९९.६२
नाशिक : ९९.६१
अमरावती : ९९.३७
औरंगाबाद : ९९.३४

खाली दिलेल्या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

https://hscresult.11thadmission.org.in
https://msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
www.mahresult.nic.in
https://msbshse.co.in

Exit mobile version